Home अकोला १९ मार्चला शेतकरी संघटना राजकीय भूमिका जाहीर करनार

१९ मार्चला शेतकरी संघटना राजकीय भूमिका जाहीर करनार

101
0

अकोला:(प्रजेचा विकास न्युज चॅनल प्रतिनिधी)-
१९ मार्चला शेतकरी संघटना राजकीय भूमिका जाहीर करनार आगामी लोकसभा निवडणुक कृषी धोरणांवर व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व्हावी या अनुषंगाने येत्या निवडणुकीतील शेतकरी संघटनेची भुमिका १९ मार्च रोजी जाहीर केली जाणार आहे.
कुणबी समाज विकास मंडळ,मंगल कार्यालय गोरक्षण रोड अकोला येथे होणाऱ्या शेतकरी संघटनेच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकी नंतर राजकीय भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रा. लो. आघाडी व सं. पु. आघाडी हे मुख्य पर्याय आहेत. इतर काही आघाड्या निवडणुक लढवतील परंतू या पैकी एकही आघाडी समाजवादी व्यवस्था सोडुन शेतकऱ्यांच्या हितासाठी खुल्या व्यवस्थेच्या बाजुने निर्णय घेण्याची शक्यता नाही.
शेतकऱ्यांना खरे स्वातंत्र्य देण्यासाठी स्वतंत्रतावादी विचाराच्या पक्षांचा पर्याय देणे गरजेचे आहे. जे उमेदवार शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी व एकुनच देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शेतकरी संघटनेने पुरस्कृत केलेला जाहिरनामा स्विकारण्यास तयार असतील त्यांना स्वतंत्र भारत पक्षा तर्फे उमेदवारी देण्याचाही निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
सर्वच प्रस्थापित पक्ष शेती विरोधी धोरणे राबवीत आहेत. शेतकर्यांना कर्जातुन मुक्त करणार असे फक्त निवडणुकीत आश्वासन दिले जाते प्रत्यक्षात फसव्या योजना जाहीर केल्या जातात. शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्याची व शेतकऱ्यांच्या हिताचे उमेदवार लोकसभेत पाठवण्याची ही संधी आहे. ही निवडणुक शेती धोरणाच्या मुद्द्यावर व्हावी यासाठी शेतकरी संघटना प्रयत्नशिल आहे.सर्व मतदार संघात शेतकर्यांच्या बाजुचे स्तंत्रतावादी उमेदवार उभे रहावेत ही शेतकरी संघटनेची अपेक्षा आहे.
अकोला येथिल बैठकीस शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या सर्व पदाधिकार्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले आहे.शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे सर्व महत्वाचे पदाधीकारी १९ मार्च च्या अकोला कार्यकारीणीला उपस्थीत राहून शेतकाऱ्यांच्या बाजूचा काय पर्याय देता येऊ शकतो या दृष्टीने मंथन करणार आहेत. असे प्रवक्ता ललित बहाळे,विदर्भ प्रमुख युवा आघाडी डॉ निलेश पाटील,प.विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा,जिल्हा प्रमुख अविनाश नाकट,सोशल मीडिया प्रमुख विलास ताथोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Previous articleपार्थ पवारांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष
Next articleमहापौर श्री राहुलदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × four =