Home अकोला तेल्हारा तालुक्यातील घटना पत्नीने केली पतीची हत्या

तेल्हारा तालुक्यातील घटना पत्नीने केली पतीची हत्या

121
0

तेल्हारा:(प्रजेचा विकास न्युज चॅनलप्रतिनिधी):-
तेल्हारा हत्याकांड प्रकरणी साथ देणाऱ्या पत्नीनेच केला पतीचा घात,लोखंडी मुसळाने सपासप वार करुन केली पतीची निर्दयी पणे हत्या,आरोपीचा पतीने आत्महत्या केल्याचा बनाव फसला
पुरावे नष्ट करण्याकरीता प्रेत घरातच जाळल्याची दिली कबुली ,आरोपीचा मुलगा घरी नसल्याने घडले हत्याकांड
चारिञ्यावर सशंय घेवुन पती,मारहाण करीत असे त्यामुळे
आरोपी पत्नीने त्याचा कायमचा काटा काढला अशी कबुली आरोपी मंगला हागे हिने दिली,तेल्हारा पोलिसांनी ४८ तासात केली आरोपीला अटक

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरात रविवारी  सकाळी ५० वर्षीय इसमाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली होती.यानंतर तेल्हारा पोलिसांनी तपास चक्रे फिरवली असता जीवनभर साथ देणाऱ्या पत्नीने पतीचा घात केल्याची बाब समोर आली याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पत्नीला अटक करण्यात आली आहे      तेल्हारा शहरातील संभाजी चौक येथील रहिवासी रमेश ओंकार हागे ५० यांचा मृतदेह काल सकाळी त्यांच्या घरासमोरील झोपडीत रक्ताच्या थारोड्यात तसेच जळलेला अवस्थेत आढळून आला होता.यावेळी हत्या झाल्याची बाब शहरात वाऱ्या सारखी पसरल्याने घटनास्थळी एकच खळबळ माजली होती.यावेळी तेल्हारा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ठाणेदार विकास देवरे  पोलीस उपनिरिक्षक सुधाकर गवारगुरु  हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अकोला येथील श्वान पथक,ठसे तज्ञ यांना पाचारण करून तपासचक्रे फिरवली.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे,स्थानिक गुन्हे शाखेचे कैलास नागरे यांनी यांनी घटनास्थळी पाहणी करून चॉकशी करण्यास सुरुवात केली. यामध्ये बऱ्याच जणांना संशयाच्या खाली विचारपूस करण्यात आली होती.यावेळी विशेष म्हणजे आरोपी पत्नीने असा काही बनाव केला होता की आरोपीची मध्यरात्री हत्या करून मृतदेह घरासमोरील झोपडीत आणून टाकला व मृतकाच्या जवळ एक चिठी लिहून टाकली व असे दर्शवले की माझ्या पतीने आत्महत्या केली.मात्र घटनास्थळावरील पुरावे आणि एकंदरीत तेथील चित्र काही वेगळेच असल्याने पोलिसांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे स्पष्ट केले होते. आरोपी पत्नी मंगला रमेश हागे हिने घटनेच्या रात्री सुमारे १.३० वाजेच्या दरम्यान पतीच्या डोक्यात लोखंडी मुसळ मारून जखमी केले त्यानंतर गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आरोपी पत्नी एवढ्यावरच न थांबता तिने पतीला घरातच जाळण्याचा प्रयत्न सुद्धा केला मात्र घरात चांगलाच पेट मृतदेहाने घेतल्याने तीने मृतदेह पाण्याने विजवून त्याला फरफटत घराच्या बाहेर आणून झोपडीत आणून टाकले.सकाळी पतीला कोणीतरी मारून घरासमोर आणून टाकल्याचा बनाव करून पोलिसांची प्रथम दिशाभूल केली मात्र तेल्हारा पोलीस,श्वान पथक,ठसे तज्ञ,गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून सदर हत्याकांड घरातच घडल्याचे समजले.हत्याकांड घडले तेव्हा मृतकाचा मुलगा हा लग्नात गेलेला होता तर मुलगी आणि आरोपी पत्नी ही शेजारच्या घरी झोपायला गेली होती मात्र आरोपी पत्नीने मोठ्या चलाखीने पतीचा अर्ध्या रात्री काटा काढला.आज सकाळी आरोपी मंगला हागे हिला तेल्हारा पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता पाहिले उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी आपला पोलीसी खाक्या  दाखवताच मीच हत्या केल्याचे कबूल केले.या प्रकरणी तेल्हारा पोलीस ठाण्यात कलम ३०२,२०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये इतर कलमे वाढण्याची शक्यता आहे.तर तेल्हारा पोलीस या हत्याकांडात अजून कोणी सहभागी होते का याचा तपास करीत आहे.सदर हत्याकांडाचा तपास तेल्हारा पोलिसांनी ४८ तासात लावल्याने त्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. या घटनेचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक विकास देवरे पोलीस उपनिरिक्षक सुधाकर गवारगुरु हे करीत आहेत
मृतकाबद्दल सर्वञ हळहळ व्यक्य होत असुन मृतक अतिशय चांगल्या स्वभावाचा होता असे बोलल्या जात आहे
या प्रकरणामध्ये आनखी आरोपी आहेत का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे

Previous articleपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदी नगरसेवक विलास मडिगेरी यांची निवड झाली
Next articleन्यायलयाच्या बाहेरील परिसरात गोळीबार ; तिघा पैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 + eight =