Home ताज्या बातम्या देहुरोड उड्डाण पुलाच्या उदघाटनाची घाई का केली गेली

देहुरोड उड्डाण पुलाच्या उदघाटनाची घाई का केली गेली

135
0

देहुरोड दि.३ फेब्रुवारी(प्रजेचा विकास न्युज चॅनल):-देहुरोड उड्डाण पुलाच्या उदघाटनाची घाई का केली गेली,
रस्ते वाहतुक व महामार्ग मंञालय,भारत सरकार व महाराष्र्ट शासन महाराष्र्ट राज्य विकास महामंडळ पुणे- मंबुई राष्र्टिय महामार्ग क्र ४८ वरील देहुरोड ते निगडी चौपदरी मार्गावर देहुरोड मध्ये उड्डाण पुल बाधंण्यात आला आहे त्याचे उदघाटन व लोकार्पण सोहळा ३ फेब्रुवारी २०१९ रोजी करण्यात आले,मा.ना.एकनाथ शिंदे(सार्वजनिक बांधकाम मंञी,सार्वजनीक उपक्रम,सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महराष्र्ट राज्य)यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले,
पुणे जिल्हाचे पालकमंञी ना. गिरीश बापट,मावळ विधान सभेचे आमदार संजय भेगडे,मावळचे खासदार श्रीरंग बारणे,विजय शिवतारे,मुख्य कार्यकारी अधिकारी,छावणी परिषद,देहुरोड चे अभिजीत सानप,उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे,छावणी परिषद सदस्य विशाल खंडेलवाल,ललित बालघरे,रघुवीर शेलार,हाजीमलंग मारिमित्तु,अरुणाताई पिंजण,गोपाळ तंतरपाळे,व नागरीक भाजपा कार्यकर्ते सर्वांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा पार पडला व त्यानंतर सुभाष चौकात सभा घेऊन आंनद व्यक्त केला गेला. पुलाचे उदघाटना ची घाई केली गेली असुन पुलाच्या उदघाटना बाबत काही नेत्यांन मध्ये व कार्यकर्त्यान मध्ये नाराजी होती, पुलाचे काम पुर्ण झाल्यावर डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊन उदघाटन झाले असते तर आनंद वाटला असता अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे,व पालकमंञ्याना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याबाबतचे निवेदन देण्यासाठी फुले शाहू आंबेडकर विचारमंच च्या नेतृत्वात काही आंबेडकरी चळवळीतील सर्व समाजातील कार्यकर्त्याना निवेदन देऊ दिले नाही,व पालक मंञ्यांनी वेळ देऊनही न भेटता व निवेदन न स्वीकारता निघुन गेल्याने नाराजी वाढली गेली,याचा परिणाम जनता मावळ लोकसभा व विधानसभेत दिसेल असे चिन्ह दिसत आहेत ते आता २०१९ मध्ये पहायला मिळेल,निवडणुकीच्या तोंडावर उदघाटन सोहळे करुन श्रेयवाद पहावयास मिळाले,राष्र्टवादी काॅग्रेसने तसे फलक ही लावले होते आघाडी सरकारच्या काळात मंजुर झालेला पुल,श्रेय लाटण्याचा हा केविलवाणा प्रयत्न, निवडणुकीत जनता कोणाला श्रेय देते.पुलाचे काम थोडेसे अपुर्ण असुन पुलाला रंगोटी केलेली नव्हती.पुढे रेल्वे रुळावरील पुलाचे काम अजुन अद्याप पुर्ण झाले नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने वाहन चालकांना ञास सहन करावा लागणार आहे,पुल सुरु होऊनही नागरिकांना समस्याना सामोरे जावे लागणार आहे.वाहतुक कोंडी व नागरी समस्या लक्षात घेऊन उड्डाण पुल बांधण्यात आला आहे.

Previous article*भाजपाच्या हातात जेव्हा पासुन सत्ता आली आहे,तेव्हा पासुन देशात अराजकता माजली आहे- अॅड.सुरेश माने*
Next articleकाँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे या सव्वा किलो वजनाचे दागिने अंगावर घालून सर्वत्र फिरतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen + 17 =