Home ताज्या बातम्या निगडीत अंगावरील दागिन्यांच्या बदल्यात सोन्याचे महागडे बिस्किट देतो सांगून महिलेला ३२ हजारांचा...

निगडीत अंगावरील दागिन्यांच्या बदल्यात सोन्याचे महागडे बिस्किट देतो सांगून महिलेला ३२ हजारांचा गंडा

114
0

निगडी, दि. २५ :(प्रतिनिधी-प्रजेचा विकास न्युज:सतीश कदम)- अंगावरील दागिन्यांच्या बदल्यात सोन्याचे महागडे बिस्किट देतो असे सांगून तिघा जणांनी एका महिलेच्या अंगावरील ३० हजारांचे दागिने आणि २ हजार रोख काढून घेतले. त्यानंतर त्या महिलेला सोन्याचे खोटे बीस्कीट देऊन फसवणूक केली. ही घटना गुरुवार (दि.२४) सकाळी साडे दहाच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथील सावली हॉटेल समोर घडली.
याप्रकरणी फसवणुक झालेल्या ४५ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास ४५ वर्षीय महिला या निगडी प्राधिकरण येथील सावली हॉटेल समोरुन पायी जात होत्या. यावेळी तीन अनोळखी तरुण तिच्याजवळ आले. त्यांनी महिलेला त्याच्याजवळील लाल कापडात सोन्याचे महागडे बिस्कीट असल्याचे सांगून, तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने द्या आम्ही तुम्हाला सोन्याचे बीस्कीट देतो असे सांगितले. यावर महिलेने तिच्या अंगावरील १५ हजारांचे मंगळसुत्र, १५ हजारांचे कानातील कर्णफुले आणि २ हजार रुपये रोख तिघा आरोपींना दिले. आरोपींनी देखील लाल कापडातील बीस्कीट महिलेला दिले आणि निघून गेले. महिलेने कापड उघडून बगीतले असता त्यामध्ये नकली बीस्कीट आढळून आहे. तो पर्यंत आरोपी फरार झाले होते. महिलेने या तिघांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक घाडगे आरोपींचा तपास घेत आहेत.

Previous articleसरकारचे कामगारांबाबतचे धोरणाच्या निषेधार्थ-सचिन साठे
Next articleशिक्षणात १०% खर्च करणार,मोहन भागवतला तुरुंगात टाकणार सत्तेत आल्यास,समांतर सरकार बंद करा- अॅड प्रकाश आंबेडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 5 =