Home लेख *बुद्ध विहारे कोणाच्या ताब्यात?बौद्धाच्या की……….*

*बुद्ध विहारे कोणाच्या ताब्यात?बौद्धाच्या की……….*

175
1

पुणे:-*बुद्ध विहारे कोणाच्या ताब्यात?बौद्धाच्या की……….*-बाळासाहेब धावारे
बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश होता. 1)
जा आणि घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, आपणाला शासनकर्ती समाज बनायचे आहे. 2) मला
सारा भारत देश बौध्दमय करायचा आहे. हे
बाबासाहेबांचे कार्य पूर्ण झाले आहे का? डाॅ.
बाबासाहेब आंबेडकरांनी 14 आॅक्टोबर 1956
ला सुमारे 5 लाख अनुयायांना नागपूर मुक्कामी
धम्म दिक्षा दिली. तसेच 16 आॅक्टोबर 1956
ला चंद्रपूर या ठिकाणी 2 लाख अनुयायाला ध्म्म दिक्षा दिली आणि परंपरागत, रूढी, परंपरा
कायमचा झुगारून नविन स्वतंत्र, समता, न्याय आणि बंधूत्व या तत्वांवर आधारीत असणारा
तथागत गौतम बुध्दांचा धम्म की, जो विज्ञानवाद, तर्कवादावर अवलंबून असणारा धम्म दिला. आज ध्म्म स्विकारून
जवळजवळ 62 वर्षे उलटली जात आहेत. मग बाबासाहेबांच अपूर्ण काम जे भारत मला बौध्दमय करायचा आहे किंवा जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा मला शासनकर्ती
समाज बनायच आहे. हे काम पूर्ण झाल का? झाले नाही तर का झाले नाही? बाबासाहेब आज जिवंत नाहीत ते तर येणार नाहीत मग ही जबाबदारी कोणाची. तर ही जबाबदारी आपल्या शिकलेल्या लोकांचीच आहे.
भारत देशात तथागताचा जन्म झाला. तथगतांनी सर्व भारत बौध्दमय केला होता. या देशातील ध्म्म शांततेच्या मार्गाने चालत असताना हा धम्म हिंसेच्या मार्गानी का ब्राम्हणने संपवून टाकला. या ठिकाणी समता, स्वतंत्र, न्याय व बंधूता नष्ट
करून येथे असमानता गट तर निर्माण करून हा धम्म नष्ट केला. पण 14 आॅक्टोबर1956 पासून आपण धर्मांतर करून ख-या अर्थाने बुध्दाचा वारसा आपण जपण्याचा प्रयत्न करत
आहोत. पण आज आपण ख-या अर्थाने बौध्द आहोत का? हा प्रश्न मला नेहमी पडत आला आहे. या देशात बौध्दांची संख्या पाहिली तर 0.8टक्के इतकी आहे. जगाच्या पाठीवर 45 देश
हे पूर्ण बौध्द आहेत. आपल्या देशत 2001 च्या जनगणनेनुसार या देशत बौध्दांची संख्या 0.8
टक्के इतकी आहे. मग आज आपण बौध्द आहोत का? मी समाजात फिरत असताना शाळेतील मुलांना प्रश्न विचारत असतो आपले आडनाव
काय आहे. तेव्हा आडनावावरून
त्यांना जात विचारली तर
ते बौध्द म्हणत नाहीत
किंवा म्हणतात पण त्यांना पुढचा
प्रश्न विचारला तर त्यांच्या टीसीवर
उल्लख असतो.हिंदू ‘महार’ मग हा बौध्द कसा होईल. काही
लोक मी जातीने
महार आहे ध्र्माने बौध्द आहे
पण तसे होवू शकत नाही.
तुमच्या टीसीवर बौध्द असायला पाहिजे तरच
तुम्हाला बौध्द म्हणून ओळखले जाईल. कधी कधी मी पाहतो मी एलआयसीमध्ये सुध्दा काम करत
असताना मला शाळेचा दाखला पाहतो त्यावर नवबौध्द असा उल्लेख पाहतो पण नवबौध्द हा ध्र्म अस्तित्वात आहे का? असे प्रश्न विचारला तर ते म्हणतात 1956 च्या नंतर ज्यांनी धर्मांतर
केला त्याला नवबौध्द म्हणतात. पण नवबौध्द हा धम्म असू शकत नाही. आपणला माहित आहे.
काही लोक इस्लाम, शिख, इसाई, जैन, ख्रिश्चन इ. धर्म स्विकारतात म्हणून ते म्हणतात मी नवइस्लाम आहे, मी नवशिख आहे, मी नवइसाई आहे, मी नवजैन आहे किंवा मी नवख्रिश्चन आहे. असे कोणीही म्हणत नाहीत म्हणून आपणच का नवबौध्द म्हणायचे हा प्रश्न आहे. आपणास
माहीत नसेल 1990 नंतर शसनाने कायदा केला
नवबौध्द म्हणून ज्यांनी आपली जात नोंद केली .मी रद्द करून महारच अशी नोंद केली. त्यामुळे
तुमच बौध्दाच प्रमाण वाढेल का?
आई-वडिलांची जबाबदारी आहे तुम्ही ज्या परिसरात राहता तेथे आपली जबाबदारी आहे.
मुल जन्मल म्हणजे तुम्ही नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत हद्दीत असाल तर तुम्ही त्या मुलाच्या जन्माची नोंद बौध्द म्हणून करायला पाहिजे. जर तुम्ही
तसी नोंद केली नाही तर त्याचा
परिणाम काय होईल.
जर शासनाने ग्रामपंचायत,
नगरपालिका किंवा महानगर
पालिका यांना प्रश्न विचारला
तुमच्या गावात किंवा भागात
बौध्दांची संख्या किती आहे?
हा अंक सांगा जर बौध्द
म्हणून नोंद नसले आणि
एका गावात 500 बौध्दाची
घर असतील पण नोंद ‘महार’ अशी असेल तर
त्या गावातील बौध्दांची संख्या शून्य होईल. मग
ती बौध्दांची घरे होतील का? ती तर हिंदूची घरे
होतील कारण महार हा हिंदूचा एक पार्ट आहे.
म्हणून आपण ही काळजी घेतली पाहिजे. काही
लोकांच्या मनात प्रश्न आहे महारांना सवलती
आहेत बौध्दाना सवलती नाहीत. म्हणून आम्ही
‘महार’ असा उल्लेख करतो. पण आपणाला
माहीत आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात
तुमच्या सवलती माझ्या कोटाच्या खिशात आहेत
किंवा डाॅ. बाबासाहेब धर्मांतराच्या आदल्या दिवशी
लोकांना सांगतात. मी उद्यापासून मी शेडूल्ड
कास्टचा सदस्य राहणार नाही का? आम्ही तर
आजही एससी आहे अस आपण सांगत आहोत.
महाराष्ट्रात एससीच्या जातीत 59 जाती आहेत
मग या 59 जातीमध्ये बौध्द येतो का? म्हणून
डाॅ. बाबासाहेबांनी बौध्दाना अल्पसंख्यांक या
गटात नोंद गेली आहे. म्हणून अल्पसंख्यकांना
सवलती उपलब्ध आहेत पण शाळेत आजही बौध्द
मूल दिसत नाहीत व अल्पसंख्याकांची सवलत
त्यांना मिळत नाही. एससीपेक्षा बौध्दाना सवलती
जास्त मिळू शकतात. म्हणून आपण बौध्द नोंद
करायला पाहिजे. आपल्याकडे धर्मांतराचे प्रमाण्पत्र असले पाहिजे. इयत्ता 1 ली ते 9 वी पर्यंत विद्यार्थ्याचे शाळेच्या दाखल्यावर नोंद करून घेवू
शकतो. किंवा आपण गॅजेट बनवून आपण बौध्द
बनू शकतो. असे अनेक मार्ग आपणाकडे आहेत.
मला एक प्रश्न पडतो मुस्लिमांची मजित
मुस्लिमाच्या ताब्यात आहेत. चर्च हे ख्रिश्चनांच्या
ताब्यात आहेत. हिंदूंची मंदिरे हिंदूच्या ताब्यात
आहेत. जैनाची मंदिरे जैनाच्या ताब्यात आहेत तसे
बौध्दाची विहारे ही बौध्दाच्या ताब्यात आहेत का?
त्या विहारावर एखादा व्यक्ती ट्रस्टी असेल आणि जर त्याच्या
दाखल्यावर हिंदू ‘महार’ असे असेल तर मग ते विहार कोणाच्या ताब्यात म्हणता येईल. हिंदू
‘महारा’च्या ताब्यात आहेत असे म्हणता येईल.
बुध्दगया येथिल मुख्य विहार हे बौध्दाच्या ताब्यात
असले पाहिजे असे आपण म्हणतो त्यासाठी
अनेकांनी संघर्ष केला. मला अभ्यासाअंती लक्षात
आल संघर्ष करणा-यात अनेक लोक ही हिंदू
‘महार’ या जातीचे असतात. मग यांना मी बौध्द
आहे अस म्हणायच बरोबर आहे का? असे अनेक
प्रश्न माझ्या पुढे आहेत. त्यामुळे यापुढे बुध्दीष्ट
इंटरनॅशनल नेट वर्कच्या माध्यमातून वरिष्ठाशी
संपर्क किंवा चर्चा करून ही मोहीम राबविण्याचा
या संघटनेचा हेतू , ध्येय आहे. त्याचा हेतू एवढाच
की त्या माध्यमातून जगाशी जोडण्याचा प्रयत्न
करतात तसेच या संघटनेच्या माध्यमातून फक्त
भारतातच नाही तर जगाला जोडण्याची प्रक्रिया
आहे. –लेखक बाळासाहेब किसन धावारे
मामुर्डी देहुरोड पुणे-९३७१०५४६७१
अध्यक्ष-बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क,पुणे जिल्हा.

(क्रमशः)(प्रसिद्ध झालेल्या वृत्त किंवा लेखाशी संपादक किवां संचालक सहमत असतील असे नाहि,लेखाची संपुर्ण जबाबदारी लेखकाची राहील)

Previous articleमाणसातला माणूस ओळखणे आणि सतत मदत करणारे व्यक्तीमत्व नितीन गवळी- गोरख गवळीसर
Next article*बुद्ध विहार ट्रस्ट,देहुरोड आयोजीत ऐतिहासिक धम्मभुमी,देहुरोड बुद्धविहाराच्या ६४ वा वर्धापन दिन*

1 COMMENT

  1. खरंच आपल्या जातीच्या दाखल्यावर बौद्ध लिहीले पाहीजे. तरच बौद्ध म्हणून गिणती होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen − fourteen =