Home ताज्या बातम्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोर्टाच्या अवमान जनक विधान केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा...

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोर्टाच्या अवमान जनक विधान केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.—सामाजीक कार्यकर्त्या अंजना गायकवाड

212
0

पिंपरी चिंचवड(प्रजेचा विकास न्युज)- नाशीक मध्ये पञकार परिषेदेत बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर या विषयी बोलताना आम्ही राम मंदिराच्या विषयात सुप्रीम कोर्टाला मानत नाही.राम मंदिर हा श्रद्धेचा भावनेचा विषय आहे यात कोर्ट निवाडा करू शकत नाही असे वादग्रस्त व संविधानीक लोकशाही विरोधी विधान केले आहे.संजय राऊत हे एक जबाबदार संसदेचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यानी बेजबाबदार पणे विधाने करणे हा एक संसदेचा आपमान आहे. सुप्रीम कोर्ट हि देशाची सर्वोच्य न्यायपालिका आहे. त्याचा मान राखण व त्याच्या नियमांचं पालन करण हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे.
राम मंदिर हा विषय अतिशय संवेदनशील आहे.हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असे असताना देखील संजय राऊत सारखे लोकप्रतिनिधी देश्याच्या सर्वोच्य न्यायपालीकेला मानायला तयार नाहीत व न्यायालयाचा अवमान करणारी विधान खुलेआम बोलतात अश्या लोकांना वेळीच आवर घातला पाहिजे तर उद्या बाकीचे लोक हि असेच वागतील आणि या देशाची लोकशाही संकटात येईल.दंगे घडतील देशांची सुशांतता भंग होईल याला जबाबदार कोण? केवळ निवडणुका जिंकायच्या जनतेला विकास काम दाखवण्यासारखं काय नाही मग केवळ जातीचं राजकारण करायचं आणि या देशात राम मंदिरच्या मुद्द्यावरून जातीय दंगली घडवायच्या या हेतूनेच संजय राऊत यांनी न्यायालयाचा अपमान करणारे विधान केले आहे. म्हणून त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा.अशी मागणी पिंपरी चिंचवड मधुन सामाजीक कार्यकर्त्या अंजना गायकवाड यांनी केली आहे,त्या बाबत त्यांनी पिंपरी पोलिस स्टेशन मध्ये निवेदन दिले आहे.या वेळी धम्मराज साळवे,संतोष शिंदे,मेघा आठवले हे उपस्थित होते.

Previous articleराम मंदीर हा श्रद्धेचा, भावनेचा विषय आहे. या विषयावर आम्ही कोर्ट मानतं नाही.- खासदार संजय राऊत
Next articleविकासनगर किवळे येथे कोजागिरी पोर्णिमा साजरी*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 + seventeen =