Home ताज्या बातम्या देहुरोड – विकासनगर येथे बंद खोलीत अढळुन आला महिलेचा मृतदेह

देहुरोड – विकासनगर येथे बंद खोलीत अढळुन आला महिलेचा मृतदेह

142
0

देहुरोड(प्रजेचा विकास न्युज)-देहूरोड – विकासनगर येथे बंद खोलीत २७ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. सायंकाळी सातच्या स़ुमारास हा प्रकार उघडकीस आला. गेले काही आठ दिवस या खोलीला टाळे होते. मृत महिलेचा पतीही बेपत्ता आहे. 
सोनीया सुल्लतानअली सेख( वय 27, रा. हनुमान कॉलनी, विकासनगर, देहूरोड) असे मृतावस्थेत आढळलेल्या महिलेचे नाव आहे. महादेव संजय अमला यांच्या खोलीत संबंधीत महिला पती सोबत एक वर्षापासून राहत होती. आठ दिवसांपासून त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता. ही गोष्ट घरमालक अमला यांना लक्षात आल्यावर त्यांनी आज सायंकाळच्या वेळेस त्यांनी खोलीच्या खिडकीची काच फोडून आतील अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काच फुटताच आतून उग्र वास बाहेर आल्याने. 
त्यांनी याबाबत तत्काळ पोलिसांना कळविले. पोलिसांच्या उपस्थितीत दरवाजा उघडला गेला व महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. तिचा पतीही सध्या बेपत्ता असल्याचे समोर आले. 
महिलेचा तिच्या पतीनेच काही कारणावरून खून  केला असावा आणि तो फरार झाला असावा, असा पोलिसांनकडुन अंदाज वर्तवला जात आहे.याबाबत देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Previous articleविजडम इंग्लिश मेडिअम हायस्कुल विकासनगर किवळे देहूरोड व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था पुणे जिल्हा आयोजित पर्यावरण व स्वछता रॅलीचे भव्य आयोजन
Next articleराम मंदीर हा श्रद्धेचा, भावनेचा विषय आहे. या विषयावर आम्ही कोर्ट मानतं नाही.- खासदार संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven + 11 =