Home ताज्या बातम्या भूमिपूजन समारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाला

भूमिपूजन समारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाला

0
Prajecha Vikas

पिंपरी दि. २३ मे २०१८- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २७, मधील रहाटणी गावठाण कडे जाणा-या स.न. ४३ मधील १८ मीटर रुंद रस्ता विकसित करणेच्या कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाला.

आज झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्या सुनिता तापकीर, सविता खुळे, निता पाडाळे, निर्मला कुटे, नगरसदस्य चंद्रकांत नखाते, शत्रुध्न उर्फ बापु काटे, ग प्रभागाचे नामनिर्देशित सदस्य विनोद तापकीर, माजी स्थायी समिती सभापती बाबासाहेब तापकीर, माजी नगरसदस्य विजय लांडे, कार्यकारी अभियंता देवन्ना गटुवार आदी मान्यवर उपस्थित होते.

या रस्त्याची लांबी एक किलो मीटर लांब व अठरा मीटर रुंद डी.पी चा रस्ता असून रस्त्या लगत ३०० व ४५० मि.मी. व्यासाचे प्रत्येकी १ कॉक्रीटचे पाइप टाकण्याचे नियोजन केले आहे. या कामासाठी सुमारे तीन कोटी सव्वीस लाख साठ हजार रुपये खर्च येणार आहे. या रस्त्यामुळे रहाटणीगावठाणा कडून रहाटणी मुख्य रस्त्यास जाणेची व्यवस्था सुलभ होणार आहे.

Previous articleबहुउद्देशीय इमारतीच्या कामाचा शुमारंभ आज महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते
Next articleगोयल गंगा इंटरनैशनल स्कुलचा निकाल १०० टक्के
admin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − 15 =