Home ताज्या बातम्या सांगवी-आत्महत्या केलेल्या महिलेवर संतप्त नातेवाईकांकडून तिच्या सासरच्या दारासमोरच पोलिस बंदोबस्तात केले...

सांगवी-आत्महत्या केलेल्या महिलेवर संतप्त नातेवाईकांकडून तिच्या सासरच्या दारासमोरच पोलिस बंदोबस्तात केले अंत्यसंस्कार

0

बारामती,दि.२९ मे २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- सांगव गावातील अत्यंत गंभीर स्वरुपाची घटना घडली.विष पिऊन आत्महत्या केलेल्या गीतांजली अभिषेक तावरे या महिलेवर संतप्त नातेवाईकांकडून तिच्या सासरच्या दारासमोरच पोलिसांच्या बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या विविहित महिलेने दोन दिवसापुर्वि विष पिले होते त्यानंतर पुण्यात महिलेवर उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी (२७ रोजी ) महिले अखेर श्वास सोडला,मृत्यू झाल्या नंतर सांगवी येथे अत्यंसंस्कारासाठी सासरच्या दारात आणल्यानंतर माहेरकडील नातेवाईकांनी अंत्यसंस्कार प्रसंगी गोंधळ घातला त्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पुढे गावात काही अनर्थ घडून नये यासाठी गावातील व सासरकडील लोकांनी दारातच अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी दिली अशी माहिती पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.

बारामती तालुक्यातील मौजे सांगवी येथील गितांजली अभिषेक तावरे या विवाहित महिलेने विष पाऊन जीवन संपविले. वारंवार पैसा व सोन्याची मागणी केल्यावर वर्षभरात १५ लाख रूपये व २५ तोळे सोने व इतर सर्व गोष्टीची पूर्तता करून देखील मृत गीतांजलीकडे पती व सासरच्यानी तगादा लावला होता. मात्र, यावेळी ५० तोळे सोन्याची मागणी पूर्ण न झाल्याने आमच्या मुलीला सासरच्या लोकांनीच विष पाजून, इंजेक्शन देऊन मारल्याचा गंभीर आरोप मृत महिलेची चुलती नमिता अरुण यादव रा.गूरसाळे ता.माळशिरस व नातेवाईकांनी केला. तसेच गीतांजलीच्या सासरच्या लोकांवर पोलिसांत लवकरच गुन्हा दाखल करणार आहे अशी माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 3 =