देहुगाव,दि.२९ मे २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महाराष्र्टातील स्ञीहत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे,असाच देहुनगरीला काळीमा फासणारा प्रकार गाथामंदीर रोड वडाचा मळा ह्या ठिकाणी घडला आहे,दिनांक २७ मे २०२१ रोजी रात्री पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास फ्लॅट नंबर २०३ नामदेव निवास साईनगर वडाचामळा देऊगाव गाथा मंदिर रोड येथे मयत पूजा वैभव लामकाने (वय १९)हिचा तिच्या नवऱ्याने गळा दाबून हत्या केली आरोपी वैभव भगवान लामकाने (वय २३)सध्या राहणार देहूगाव मूळ पंढरपूर,चार महिन्यापुर्वी प्रेम प्रकरणातुन लग्न करुन नव जोडपे हे देहुत राहत होते,दोघांच्या घरच्यांना लग्न मान्य नसल्याने दोघे वेगळे राहत होते माञ सतत त्या दोघांमध्ये खटके उडत असे. कौंटबिक वादातुन नवरा बायकोच भांडण पार पोचले शिगेला अरोपी (वैभव लामकाने) पतीने गळा दाबुन केला पत्नी पुजा चा खुन,आई वरुन शिव्या दिल्याचा राग अरोपी पतीला अनावर झाल्याने पत्नी पुजा हिचा अरोपी ने राञी झोपेतच दाबला गळा,आणि बनवला पत्नीला हॅटक आल्याचा बनाव केला माञ पोलिसांना सशय बळावल्याने अरोपीला खाक्या दाखवताच अरोपीने हत्याची कबुली दिली,अरोपी वैभव लामकाने यास देहुरोड पोलिसांनी अटक केली असुन देहुरोड पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजि.२८२/२०२१ भा.द.वि कलम ३०२ प्रमाणे आरोपी पती वैभव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, पूजाला लामकाने हिचे वडील सोमनाथ रामदास पाटील यानी फिर्याद दिली आहे, भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे पाटील यांनी पुजाला दत्तक घेतले होते मानस मुलगी जरी असली तरी तिचा संभाळ आणि तिचे शिक्षण चांगले करुन घेतले होते माञ वैभव याने प्रेमाच्या जाळयात अडकवुन तिच्याशी प्रेमविवाह केला माञ तो संभाळण्यास तो असमर्थ ठरला आहे,त्याने जो निंदनिय घृणास्पद प्रकार केला त्यामुळे संपुर्ण देहुनगरीत हळहळ व्यक्त केली जात आहे.आरोपी वैभव भगवान लामकाने याला फाशीची शिक्षा व्हावी असे मयत पुजाच्या नातेवाईकांची मागणी आहे,सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहिद पठाण यांच्याकडे असून ते व देहूरोड पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Home ताज्या बातम्या देहुगाव-पत्नीचा गळा दाबुन पतीनेच केली हत्या चार महिन्यापुर्वी झाला होता प्रेमविवाह