रावेत,दि.११ नोव्हेंबर २०२४( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी ):-पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यासाठी मैदानात उतरले असून त्यांनी रावेत येथे सुमारे १०००० ते ११००० कार्यकर्ते,नागरिक जेष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत निर्धार मेळावा घेत शंकर जगताप यांना जाहीर पाठींबा दिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शंकर जगताप यांचे पारडे जड झाले आहे. दापोडी पिंपळे गुरव ते रावेत किवळे असा हा विधानसभे चा प्रभाग त्यात पावना नदीमध्ये त्यामुळे नदीच्या अलीकडे नदीच्या पलीकडे असे दोन उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता होती मात्र मोरेश्वर भोंडवे यांना मशालीला वार्ड न सुटल्याने त्यांची गोची झाली होती पण अखेर विधानसभेच्या नदीच्या अलीकडच्या भागात किंगमेकर मोरेश्वर भोंडवे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते दिनांक १० नोव्हेंबर रोजी त्यांनी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते नागरिकांच्या उपस्थितीत चिंचवड विधानसभेच्या गतिमान विकासाला म्हणजेच शंकर शेठ जगताप यांना जाहीर पाठिंबा दिला त्यामुळे शंकर जगताप हे एकतर्फी निवडून येतील अशी चर्चा संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात रंगली आहे. अखेर मोरेश्वर भोंडवे यांनी टाकलेला डावपेच यामुळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल कलाटे यांची गोची मात्र नक्की झाल्याचे पाहायला मिळते, त्यामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन नक्की वाढले, भाऊसाहेब भोईर यांना देखील याचा फायदा होईल का तोटा होईल हे देखील पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप विरुद्ध मोरया गोसावी ची भक्ती आणि चाफेकरांची क्रांती या जयघोषात निवडणूक रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर अशी लढत पाहायला मिळेल यात मात्र आता शंका नाही. उपस्थित कार्यकर्त्यांनी मोरेश्वर भोंडवे आणि शंकर जगताप यांना एकत्रितपणे पुष्पहार घालून या नवीन युतीचे जोरदार स्वागत केले.
सर्वांशी बोलताना मोरेश्वर भोंडवे म्हणाले की, चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मीदेखील तयारी केली होती. मात्र तिकीट न मिळाल्याने मी या निवडणुकीतून माघार घेतली होती. परंतु माघार घेतली तरी चिंचवड विधानसभेच्या विकासाचा मुद्दा हा माझ्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा होता. आणि यासाठी मला सक्षम पर्याय म्हणून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप हेच योग्य वाटले. त्यामुळे माझ्या सर्व सहकारी मित्रांशी आणि रावेतमधील जनतेचा कौल घेत मी शंकर जगताप यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेत. या निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने या निवडणुकीत जगताप यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी कमळ या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन, मोरेश्वर भोंडवे यांनी किवळे रावेत मामुर्डी वासीयांना केले.यावेळी कुणाल भोंडवे, आप्पा रेणुसे, उमेश चांदगुडे, नामदेव ढाके, मनोज खानोलकर, चेतन भुजबळ, संतोष कलाटे, कुणाल लांडगे, दत्तामामा भोंडवे, विजय जगदाळे, तात्या आहेर, श्री. कोंडे, सौ. मरळ यांच्यासह रावेत परिसरातील हजारो ग्रामस्थ आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सर्व सोसायटी यांचे चेअरमन ज्येष्ठ नागरिक व मोरेश्वर भोंडवे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमचे सहकारी मित्र मोरेश्वर भोंडवे यांनी दिलेल्या जाहीर पाठींब्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. भोंडवे यांच्याकडेही विकासाची दूरदृष्टी आहे. रावेत गावच्या विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी दिलेल्या जाहीर पाठींब्यामुळे निश्चितच आमची ताकद द्विगुणीत झाली असून आमच्या विक्रमी मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास दुणावला आहे. आगामी काळात आम्ही खांद्याला खांदा लावून चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी काम करणार असून त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य कायम आमच्यासोबत असेल. तसेच मामुर्डी,किवळे रावेतच्या जनतेनेही जो विश्वास माझ्यावर व्यक्त केला आहे त्या विश्वासाला नक्कीच पात्र होण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन व चिंचवड विधान सभेत गतिमान विकास करेन– शंकर शेठ जगताप (महायुतीचे अधिकृत उमेदवार)