Home ताज्या बातम्या  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 41 वर्षांच्या इतिहासात प्रथमच कर संकलन विभागाचे 977 काेटींचे उत्पन्न…

 पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 41 वर्षांच्या इतिहासात प्रथमच कर संकलन विभागाचे 977 काेटींचे उत्पन्न…

99
0

पिंपरी-चिंचवड,दि.01 एप्रिल2024 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षात तब्बल 977 कोटी 50 लाख रुपयांचा कर वसूल केला आहे. महापालिकेच्या 41 वर्षांच्या इतिहासात प्रथमच 1 हजार कोटींच्या जवळपास टप्पा गाठला आहे. हा कर संकलन विभागाचा एक माईलस्टोन ठरला आहे. 6 लाख 25 हजार मालमत्ता धारकांपैकी 5 लाख 11 हजार 154 मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. कर भरणा-या प्रामाणिक करदात्यांचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आभार मानले आहेत.


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर प्रमुख स्त्रोत आहे. महापालिका हद्दीत 6 लाख 25 हजार मालमत्ता आहेत. यापैकी 5 लाख 11 हजार 154 मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. कर संकलन व कर आकारणी विभागाने गतवर्षी 816 कोटींचा कर वसूल केला होता. यंदा तब्बल 161 कोटींचा अधिक कर वसूल करण्यात महापालिकेला यश आले आहे.

यंदा कर वसुलीसाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख आणि त्यांच्या टीमने मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आहे.

गेल्या वर्षभरापासून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, नळ कनेक्शन खंडित करणे, बड्या थकबाकीदारांची नावे वर्तमान पत्रात नावे प्रसिद्ध करणे, मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया, मीम्स, रिल्स सारखी अनोखी स्पर्धा, शहरात वर्दळीचे ठिकाण, मुख्य चौक, रस्ते इ. ठिकाणी होर्डींग्ज व फ्लेक्सद्वारे जाहिरात प्रसिद्धी, पॅम्पलेट वाटप, सोशल मिडीयाद्वारे चित्रफीत, लाऊडस्पिकरवर थकबाकीदारांच्या नावांची घाेषणा करणे, जिंगलद्वारे जाहिरात प्रसिद्धी, कर संवाद अशा माध्यमातून करदात्या थकबाकीदारांमध्ये वेळोवेळी जनजागृती करण्यात केली. याचे फलित म्हणूनच एक हजार काेटींच्या जवळपास कर वसुल झाला आहे.

मालमत्ता कर वसुलीसाठी नागरीकांना मालमत्ता कराची बिल ऑनलाईन तसेच कर भरण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मालमत्ताधारकांचे विविध घटकांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन कर सवलत योजना, थकित कर वसुलीसाठी वेळोवेळी घरभेटी देणे, पत्र देणे, जप्तीपुर्व नोटीसा देण्याची कार्यवाही करण्यात आली.

  •  महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 977 काेटींची मजल
  • दोन हजारांपेक्षा जास्त मालमत्ता सील.
  •  विभागाच्या संपूर्ण सेवा ऑनलाईन.
  • पहिल्यांदाच 87 टक्के चालू कर वसूल करण्यात यश
  • 49.36 टक्के थकीत कर वसूल करण्यात यश

असा आला रूपया
ऑनलाईन – 554 कोटी 59 लाख  

रोख.       – 137 कोटी 49 लाख 

धनादेशाद्वारे – 166 काेटी 57 लाख

ईडीसी – 13 काेटी 81 लाख 

आरटीजीएस -44 कोटी 76 लाख 

डीडी – 8 काेटी 57 लाख 

विविध ॲप – 10 कोटी 2 लाख

इनइफ्टी – 6 काेटी 93 लाख 

 

कर भरणाऱ्या मालमत्तांची आकडेवारी

औद्योगिक – 4 हजार 609

निवासी- 4 लाख 42, 285

बिगरनिवासी – 46 हजार 576
मिश्र- 12 हजार 968 
मोकळ्या जमिन 4 हजार 574 
इतर – 142
एकूण 5 लाख 11 हजार 154

वाकड झोनमधून 154 काेटींचा उच्चांकी कर वसूल  शहरात कर संकलनासाठी महापालिकेचे 17 झोन आहेत. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक म्हणजे 68 हजार मालमत्ता धारकांनी 154 काेटी 58 लाख रुपयांचा कर जमा केला आहे. त्याखालोखाल सांगवीत 51 हजार 718, चिखलीत 45 हजार 634, थेरगावमध्ये 45 हजार 434, चिंचवडमध्ये 43 हजार 286, माेशीत 34 हजार 980, भाेसरीत 33 हजार 867 मालमत्ता धारकांनी कराचा भरणा झाला आहे. तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये फक्त 8 हजार 527 मालमत्ता धारकांनी कर भरणा केला आहे.

कर वसुलीचा वाढता आलेख

वर्ष     वसुल झालेल्या कराची वाढता आलेख
2018-19 :   471 कोटी
2019-20 :  480 कोटी  
2020-21 :  553 कोटी
2021-22 :  628 कोटी
2022-23  :  816 कोटी
2023-24  :  977 काेटी 

यंदा आम्ही एक हजार कोटींच्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोचलो याचे समाधान आहे. मालमत्ताधारकांना मी यानिमित्त धन्यवाद देऊ इच्छितो. या वर्षी आम्ही प्रथमच सिद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून बचत गट महिलांकडून बिले वाटप, डाटा अनालिसिस, जनजागृतीसाठी उत्तम क्रिएटिव्ह, सर्व सेवा ऑनलाईन करणे अशा विविध माध्यमातून नागरिकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहित केले. त्याचाच हा परिणाम आहे. या कराचा विनियोग हे शहर उत्तम शाश्वत विकासाचे मॉडेल होण्यासाठीच वापरला जाईल. सन 2024-25 या वर्षात सर्वेक्षणातील सर्व नवीन मालमत्तांची कर आकारणी करणे, करविषयक सर्व अभिलेखांचे स्कॅनिंग, डीजिटायझेशन करून हा विभाग संपूर्णतः लोकाभिमुख होईल याचा प्रयत्न राहील. तसेच सर्व मालमत्तांच्या युपिक आयडी द्वारे महापालिकेच्या सर्व सेवा एकत्रित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
:- शेखर सिंह,आयुक्त
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

यंदा आम्ही प्रथमच मालमत्ता कर आणि पाणी पट्टी वसुली एकात्मिक पद्धतीने वसूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी दोन्हींमध्ये भरघोस वाढ झाली आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेली जप्ती मोहीम आणि यंदा जप्ती केलेल्या मालमत्तांची प्रथमच राबवलेली लिलाव प्रक्रिया याचाही कर संकलनाला उपयोग झाला आहे. यापुढेही जप्ती आणि लिलाव प्रक्रिया वर्षभर निरंतर स्वरूपात राबवण्यात येईल. नागरिकांनी त्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत. यंदा आम्ही इतर शासकीय विभाग जसे की IGR, महावितरण यांच्या डेटाबेेसबरोबर एकात्मिकरण करणार आहोत. त्यामुळे सेवेचा दर्जा वाढण्यास मदत होईल.
:- प्रदीप जांभळे पाटील
अतिरिक्त आयुक्त
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

माननीय आयुक्त यांचे कर संकलन विभागाचे व्हिजन आणि माननीय अतिरिक्त आयुक्त यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन यामुळे आम्ही हा टप्पा गाठू शकलेलो आहोत. येत्या वर्षभरात माननीय आयुक्त यांचे व्हिजन संपूर्णतः अंमलात आणण्याचा आमचा नम्र प्रयत्न राहील.
:- नीलेश देशमुख
सहायक आयुक्त
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Previous articleबारणे यांना मावळमधून विक्रमी मताधिक्य देण्याची आजी-माजी आमदारांची ग्वाही
Next article78 काेटींची विक्रमी पाणीपट्टी वसुली,तब्बल 27 टक्क्यांनी वाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen − nine =