देहुरोड,दि.२४ मार्च २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मुख्यमंत्री व गुहमंत्री यांच्या मंत्रालयातील दालना समोरील गॅलरीतील मजल्या वरून उडी मारणार, पैसे खा परंतु गुन्हेगारावर वर्चस्व ठेवा मेसेज होतोय प्रचंड वायरल पोलिस आयुक्त लक्ष देतील का? असे अनेक संभ्रम वाढवणारे प्रश्न निर्माण होत आहे.संपुर्ण शहरात जोरात चर्चा पसरत आहे.
देहूरोड पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आहे. या गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील, पोलीस अपयशी असल्याचे दिसत आहे. काही दिवसापुर्वी विकास नगर येथील एका युवकाचा खून झाल्यानंतर विकास नगर भागात अनेक गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. असा आशयाचा मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात देहुरोड मध्ये वायरल होत आहे. हा मेसेज दुसरा तिसरा कोणी नसून फुले शाहू आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांचा आहे.यावर पोलिस काय कारवाई करणार गुन्हेगारांना जरब बसवतील का? देहुरोड विकासनगर मधील नागरीक निष्टेचा श्वास घेतील का?भयभयभीत जनता पोलिसांवरील अवलंबुन आहे.लोकसभेच्या निवडणुका लागल्याने अधिच वातावरण तणावाचे आहे.
काय आहे मेसेज तंतरपाळे यांचा वाचा खाली
कुपया माहिती साठी
देहुरोड पोलिस स्टेशनला आलेला पी,आय,गुन्हेगारीवर वर्चस्व दाखविण्या पुर्वी दोन नंबर च्या धंद्या वाल्यांची माहीती घेतो परंतु गुन्हेगारांची व सर्व सामान्य जनतेला त्रास देणा-यांची माहीती घेत नाही
,मी स्वता जबाबदार जन प्रतिनिधी यांना गेली दीड वर्षा पासुन यांना सांगतो विकास नगर परिसरामंध्ये गुन्हेगार मुल फिरतात त्यांना समज द्या काही दिवसा पुर्वी येथे तरुणाचा खुन झाला,त्याला देहुरोड पोलिस जबाब दार आहे,आमच्या विकासनगर कडे एकही पोलिस राऊड मारत नाही,मी स्वता मुख्यमंत्री व गुहमंत्री यांच्या मंत्रालयातील दालना समोरील ग्यालरीतील मजल्या वरून उडी मारणार मला पण धर्मपाल तंतरपाळे म्हणतात ,पैसे खा परंतु गुन्हेगारावर वर्चस्व ठेवा हिच विनंती,आम्ही गुन्हेगारांचा बदोबस्त करु शकतो,फक्त आमच्यावर गुन्हा दाखल होणार नाही याची हमी द्या
आपला
धर्मपाल तंतरपाळे