Home ताज्या बातम्या वायसीएम मध्ये महासंघ मेडिकल ची सेवा पुन्हा सुरू;मेडिकलची नुकसान भरपाई वसूल करण्यासाठी...

वायसीएम मध्ये महासंघ मेडिकल ची सेवा पुन्हा सुरू;मेडिकलची नुकसान भरपाई वसूल करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू – बबनराव झिंजुर्डे

122
0

पिंपरी,दि. २० मार्च २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने मनपा कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय आणि शहरातील गोरगरीब नागरीकांना सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे “महासंघ मेडिकल्स” हे औषधांचे दुकान बुधवारी (दि.१३) पुन्हा सुरु करण्यात येत आहे. ही सेवा ना नफा-ना तोटा या तत्वावर यापूर्वी  दि. ०८ फेब्रुवारी २०१५ पासून सुरु करणेत आली होती. परंतु न्यायालयीन प्रक्रीयेमध्ये मागील काळात सेवा खंडीत होती. आता महासंघ मेडिकलची सेवा सर्वांसाठी अविरतपणे सुरु करण्यात आली आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे यांनी दिली.

मेडिकलची सेवा सर्वांसाठी अविरतपणे सुरु करण्यात आली आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे यांनी दिली.
बुधवारी वाय.सी.एम. रुग्णालयाच्या चाणक्य हॉलमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती देताना झिंजुर्डे यांनी सांगितले की, सन २०१९ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची निवडणुक झाली व सदर निवडणुकीमध्ये अंबर चिंचवडे यांचे सह त्यांचा संपुर्ण पॅनल विजयी झाला व सदर मेडिकल स्टोअरचा ताबा त्यांच्याकडे कामगार आयुक्त, पुणे यांचेकडील नियुक्त करणेत आलेल्या प्रशासकामार्फत सुपूर्द करण्यात आला.
दिनांक २५/०२/२०२२ रोजी पुन्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची निवडणुक झाली असुन सदर निवडणुकीमध्ये शशिकांत झिंजुर्डे यांचेसह त्यांचा पॅनल विजयी झाला. वास्तविक निवडणूक झाल्यानंतर पुर्वीच्या पदाधिकाऱ्यांने नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांकडे कर्मचारी महासंघाच्या सर्व स्थावर मालमत्तांचा ताबा देणे गरजेचे होते. तसेच मा. औद्योगिक न्यायालय, पुणे तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिनांक ०१/०८/२०२२ पर्यंत ताबा देण्याचे आदेशीत केले होते. परंतु माहे जानेवारी २०२४ पर्यंत कोणत्याही प्रकारचा ताबा देण्यात आलेला नाही.
प्रकारचा ताबा देण्यात आलेला नाही.
सदरबाबत माजी पदाधिकाऱ्यांना ताबा देणेसंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करणेत आला असून सदर बाबत अद्याप पर्यंत कोणतेही उत्तर महसंघास प्राप्त झालेले नाही. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांची व शहरातील गोरगरीब नागरिकांची गैरसोय लक्षात घेता सदर मेडिकल स्टोअर पुन्हा कार्यरत करणेसाठी त्यातील औषधांची मोजदाद करणेसाठी दिनांक ०१/०१/२०२४ रोजी जाहिर नोटीस प्रसिद्ध करणेत आली व त्याअनुषंगाने सर्वात कमी दरपत्रक सादर करणाऱ्या संस्थेस मेडिकल मधील औषधे व साहित्यांची मोजदाद करण्याचे कामकाज देणेत आले.
दिनांक ०९/०१/२०२४ रोजी रितसर पंचनामा व संपुर्ण छायाचित्रीकरण करुन स्टॉक ऑडीट करणेत आले. सदर संस्थेने दिनांक १३/०१/२०२४ रोजी स्टॉक रिपोर्ट सादर केला असुन त्यामध्ये संगणकावरील उपलब्ध स्टॉक – र. रु. २९,७९,७६५/- , मुदतबाह्य झालेली आषधे – र. रु. १०,८१,४५८/- , वापरण्या योग्य असलेली औषधे – र. रु. ५,४८,४८९ /- , संगणकावरील स्टॉक व प्रत्यक्ष उपलब्ध असलेल्या स्टॉक मधील तफावत – र. रु. १३,४९,८१८/- तसेच दवा बाजारमधील व्यापाऱ्यांची थकीत बील र. रु. २४,००,०००/- एवढी आहे.
वरील सर्व परिस्थिती पाहता मेडिकल स्टोअर सह मनपा कर्मचाऱ्यांचे जवळपास २४,३१,२७६/- एवढ्या रकमेचे नुकसान झालेले आहे. तसेच थकीत र. रु. २४,००,०००/- देणे रकमांबाबत व नुकसान भरपाईबाबत संबंधीतांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रीया सुरु आहे.
पत्रकार परिषदेपुर्वी बबनराव झिंजुर्डे यांच्या हस्ते महासंघ मेडिकलची सेवा पुर्नकार्यान्वित करण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ आणि पिंपरी चिंचवड मनपा सेवक पतसंस्थेचे सर्व  संचालक, सल्लागार व पदाधिकारी उपस्थित होते.
Previous article‘स्त्री कुटुंबाचा कणा’ – तेजश्री मोहिते
Next articleमंत्रालयाच्या गॅलरीतून उडी मारणार,पैसे खा परंतु गुन्हेगारावर वर्चस्व ठेवा-सोशल मीडियावर होतोय वायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 + eight =