Home ताज्या बातम्या ‘स्त्री कुटुंबाचा कणा’ – तेजश्री मोहिते

‘स्त्री कुटुंबाचा कणा’ – तेजश्री मोहिते

0

पिंपरी,दि. २० मार्च २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- स्त्री ही कुटुंबाचा कणा आहे. तिच्यामध्ये अलौकिक शक्ती, जिद्द, चिकाटी आणि ऊर्जा निसर्गाने दिलेली आहे. संपूर्ण कुटुंबाला ती प्रेमाने घट्ट बांधून ठेवते. म्हणूनच भारतीय संस्कृती मध्ये स्त्री शक्तीचा गौरव करण्यात आला आहे, असे पीसीईटीच्या प्रशासकीय अधिकारी तेजश्री मोहिते यांनी सांगितले.

  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझीईन मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोहिते बोलत होत्या.
  यावेळी एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझीईनचे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, एस. बी  पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, पीसीसीओई संगणक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनुराधा ठाकरे, कल्याणी घारे आदी उपस्थित होते.
  स्त्रीला नेहमी क्षमाशील, दयाळू कुटुंबाचा खंबीर आधार म्हणून पहिले जाते, असे डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी सांगितले.
  डॉ. अनुराधा ठाकरे म्हणाल्या स्त्रियांना समानतेसाठी संघर्ष करण्याची गरज नाही. स्त्री ही परिश्रमिक व सकारात्मक विचार करणारी व शांतीचे प्रतीक म्हणून ओळखली जाते.
  डॉ. महेंद्र सोनावणे म्हणाले, महिलांना जीवनामध्ये सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी भविष्यात समान संधी उपलब्ध होतील. स्त्री आणि पुरुष ही कुटुंबाची दोन चाके आहेत. दोघांनी एकमेकांना समजून घेतले तर कुटुंबाची शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक प्रगती होईल.
   पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व पीसीयू चे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्किटेक शिवा शिशोदिया यांनी केले. प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे यांनी आभार मानले.
Previous articleशिवतारेनी माफी मागितली तर आम्ही काम करु अन्यथा..-अजित गव्हाणे
Next articleवायसीएम मध्ये महासंघ मेडिकल ची सेवा पुन्हा सुरू;मेडिकलची नुकसान भरपाई वसूल करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू – बबनराव झिंजुर्डे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

six − 5 =