Home गुन्हेगारी जगत मायकार शोरुम मध्ये कर्मचारी महिलेचा विनयभंग तर पिडित महिलेला सीईओ सोबत जाण्यासाठी...

मायकार शोरुम मध्ये कर्मचारी महिलेचा विनयभंग तर पिडित महिलेला सीईओ सोबत जाण्यासाठी दोन महिलांचा दबाव .?

774
0

वाकड,दि.०७ सप्टेंबर २०२३ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- मायकार शोरुम व सुझुकी शोरुम येथे सेल्स एक्झिक्यूटिव्ह म्हणुन काम करणार्‍या महिलेशी छेडछाड करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.त्याबाबत हिंजवडी पोलिस स्टेशन मध्ये पिडित महिलेने तक्रार अर्ज दिला आहे.अद्याप अजुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.पोलिस उपनिरिक्षक अजित काकडे यांच्या कडे तपास असुन महिंलाचे जबाब घेतला असुन सीईओ पाटील व एचआर टिमचा जबाब घेतलेला नाही,त्यामुळे शोरुम व पिंपरी चिंचवड हिंजवडी परिसरात उलटसुलट चर्चेचा विषय बनला आहे.सीईओ यांना प्रजेचा विकास ने संपर्क केला असता त्यांनी एचआर संपर्क करतील असे सांगितले व एचआर किरण व किशोर यांनी संपर्क केले असता सदर प्रकार शोरुम अंतर्गत आहे.तुमचा काय संबध असे उडवाउडवीचे उत्तर दिले.दुसर्‍या एचआर वैभव राऊत फोन वरुन यांच्याशी संपर्क साधला त्यानी फोन उचलले नाही.माञ पिडित महिलेला वेगवेगळया ठिकाणी बोलुन प्रकरण दाबण्याचा प्रकार करीत आहेत.त्यामुळे पिडित महिला हतबल झाली आहे.सदर प्रकरणात शोरुम मधील सीईओ व महिला एचआर यांना मदत करण्यासाठी राजकीय सामाजीक वरदहस्त असणारे पुढारी ही हस्तक्षेप करीत आहेत.त्यामुळे वेगळे वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नेमका काय घडलाय प्रकार

पीडित महिला माय कार शोरूम वाकड मारुती सुझुकी शोरूम येथे सेल्स एक्झिक्यूटिव्ह म्हणून चार महिन्यापासून नोकरीला होती नोकरी जॉईन केल्यापासून शोरूमचे सीईओ पाटील यांचे वागणे पीडित महिलेला वेगवेगळे वाटू लागले विनाकारण ते पीडित महिलेशी बोलण्याचा प्रयत्न व तिला इशारे करून कॅबिनमध्ये बोलावणे तसेच अश्लील नजरेने पाहणे हा प्रकार करत, हा प्रकार पीडित महिलेच्या लक्षात येता. तेथील एचआर वैभव राऊत यांना तिने सांगितले त्यावर एचआर यांनी त्यांना मी बघून घेतो तू लक्ष देऊ नको असे बोलून टाळाटाळ केली. वैभव राऊत यांना वारंवार सांगुन कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे पीडित महिलेचा त्रास सिईओं टिम लीडर महिला व मॅनेजर महिला यांच्या माध्यमातून वाढत गेला शोरूम मध्ये नोकरीला असणारे टीम लिडर महिला व मॅनेजर महिला ह्या पीडित महिलेला म्हणत “तुला काय अडचण आहे, पाटील सरांशी बोलायला” तुझी ते चांगली काळजी घेतील, तुझ्या मुलांचा संभाळ करतील असे पण तुला कोण आहे. त्यांच्यासोबत बोलत जा.. त्यांना भेटत जा… आम्ही पण गेले कित्येक वर्षापासून त्यांच्यासोबत आहे ते आम्हास सांभाळून घेतात तुही त्यांच्यासोबत राहा असे बोलून त्या पीडीत महिलेला पाटील यांच्याकडे जाण्यास दबाव टाकत होते. मात्र पीडित महिलेने मला असल्या गोष्टी आवडत नाही बोलून विरोध केला. व ट्रेनिंग मॅनेजर अरविंद धुळे यांना सांगितले मात्र त्यांनीही पीडित महिलेच्या या गोष्टीकडे लक्ष दिले नाही टाळाटाळ केली टीम लीडर महिला व मॅनेजर महिला यांनी विनाकारण पीडित महिलेला कस्टमर समोर बडबड करणे तिने घेतलेल्या गाडीच्या बुकिंग दुसऱ्यांना ट्रान्सफर करणे त्यानंतर कस्टमरला फोन करून सांगणे. की पीडित महिलेने फ्रॉड केला आहे. असे सांगून पीडित महिलेची बदनामी करत. पीडित महिलेने याबाबत विचारणा केली असता पीडित महिलेचे थंब बंद केले. कंपनीचे मोबाईल सिम कार्ड बंद केले. सदरचचा प्रकार हा त्यांनी नोकरीवर असताना केले. याबाबत एचआर वैभव राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी सगळं व्यवस्थित होईल असे पिडित महिलेला सांगितले.व सीईओ पाटील व दोन्ही महिलांना पाठीशी घालुन सहकार्य केल्याचे पिडीत महिलेनी सांगितले.

जुलै 2023 पासून पीडित महिला काम करत असणाऱ्या मायकर शोरूम पुणे बंगलोर रोड वाकड पुणे येथे कंपनीचे सीओ पीडीएफ महिलेची जवळीक निर्माण करण्यासाठी इशारे करून त्यांच्या केबिनमध्ये बोलवणे तसेच अश्लील नजरेने पाहणे व त्यांना रिस्पॉन्स न दिल्यामुळे दोन महिला एक टीम लीडर व एक मॅनेजर यांच्यामार्फत पीडित महिलेला त्रास देणे व सीईओ पाटीलशी जवळीक निर्माण करण्यासाठी विरोध करत असताना शोरूमच्या कस्टमर समोर विनाकारण बडबड करणे बदनामी करणे असे प्रकार करत असल्याने पीडित महिलेने हिंजवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार अर्ज दाखल केला मात्र त्या तक्रार अर्जावर अद्याप पर्यंत कोणतीही दखल न घेता गुन्हा दाखल करण्यात आला नाही. सदर प्रकाराला विलंब होत असल्याने पीडित महिलाही तणावात गेली असून एकटी महिला असल्याने ती घाबरलेल्या अवस्थेत आहे. सदरचे प्रकरण मिटवून घेण्यासाठी शोरूम कडून व काही पोलीस अधिकाऱ्यांकडून सीईओ पाटील यांना पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे.पाटील यांच्यावर या आधीही महिलांनी आरोप केले आहे,त्या विरोधात तक्रार ही दाखल आहे. व एका राजकीय पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्याकडूनही दबाव आणला जात असल्याचे पिडित महिलेने पञकारांशी बोलताना सांगितले. सदरच्या या घटनेमुळे संपूर्ण शोरूम मध्ये चर्चेचे वातावरण बनले आहे. शोरूम चे मालक अजय गर्ग सीईओ पाटील व तसेच दोन महिला व एचआर टीम यांच्यावर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण शोरूमच्या कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. पोलीस अधिकारी संबंधित पीडित महिलेला न्याय देणार का असा प्रश्न संपूर्ण शोरूमच्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.एखादी पीडित महिला न्याय मागण्यासाठी जर कोणाकडे जात असेल तर तिला न्याय ऐवजी तिच्या अब्रूची दिंडवडे काढून तिचे खच्चीकरण केले जाते ती महिला ताट मानेने तिचा न्याय हक्कासाठी लढण्यासाठी खंबीर उभे राहू शकत नाही.असा पूर्ण प्रयत्न केला जातो त्यावेळी हातबल झालेल्या पीडित महिलेने कोणाकडे न्याय मागावा असे प्रजेचा विकासशी बोलताना पीडित महिलेने तिचे मत व्यक्त केले आहे.

Previous articleओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Next articleभाऊंच्या आमदार निधीतून बांधलेल्या सांस्कृतिक सभागृह व विरंगुळा केंद्राचे उद्घाटन शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 + three =