Home ताज्या बातम्या भाऊंच्या आमदार निधीतून बांधलेल्या सांस्कृतिक सभागृह व विरंगुळा केंद्राचे उद्घाटन शंकरशेठ जगताप...

भाऊंच्या आमदार निधीतून बांधलेल्या सांस्कृतिक सभागृह व विरंगुळा केंद्राचे उद्घाटन शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले

306
0

किवळे,दि.०८ सप्टेंबर २०२३ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृह व विरंगुळा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले,दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचे बंधू शंकर शेठ जगताप भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला.

या वेळी बोलताना शंकरशेठ जगताप म्हणाले की,असे केंद्र ही काळाची गरज आहे.हळुहळू इमारती उभ्या राहील्याने जेष्ठ नागरीकांना बसण्या उठण्याची हक्कीची जागा निर्माण झाली आहे.सभागृह असल्याने छोटे खाणी असणारे कार्यक्रम गोरगरींबाचे कार्यक्रम अशा ठिकाणी होतील.मा.नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी सर्वाचे स्वागत पर मनोगत व्यक्त करताना म्हटले की,दिवगंत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आमदार निधीतुन हे सांस्कृतिक सभागृह व विरंगुळा केंद्र उभे राहिले आहे.याचे उद्घाटन करत असताना लक्ष्मण भाऊ आपल्या सोबत आहेत असे वाटत आहे कारण या केंद्राच्या माध्यमातून सतत कार्य करण्याची प्रेरणा या सांस्कृतिक सभागृह व केंद्राकडे पाहून वाटत राहील असे अनेक भावांचे काम आहेत ज्याकडे पाहिले की गर्व वाटतं की आम्ही भाऊंचे कार्यकर्ते आहोत शंकर शेठ जगताप भाऊप्रमाणेच आपल्या विकास नगर किवळे रावेत प्रभागाकडे लक्ष देतील.आम्हाला भाऊंची कमी भासणार नाही.तुमच्या माध्यमातुन भाऊच आमच्या सोबत आहेत,अशी एक आशा बाळगतो असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजन मा. नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी केले होते, या मंगलमय प्रसंगी माजी नगरसेवक बाळासाहेब जयवंत तरस, माजी नगरसेवक विभीषण चौधरी, शिवसेना शहराध्यक्ष निलेश तरस, युवा नेते दीपक मधुकर भोंडवे, आरपीआयचे नेते गौतमजी गायकवाड, विनोद चांदमरे, मोरेश्वर कातळे,पञकार विकास कडलक,मनसे नेते किरण गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ नागरिक भारतीय जनता पार्टी व सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी महिला जास्त संख्येने उपस्थित होते.सोमेश्वर जेष्ठ नागरिक संघ आदर्श नगर किवळे रावेत यांनी परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघटना निमंत्रित केले होते. अध्यक्षा श्रीमती वृषाली मरळ- ज्येष्ठ नागरिक महासंघ पिंपरी चिंचवड शहर, नानासाहेब डोईफोडे- अध्यक्ष विकास नगर किवळे ज्येष्ठ नागरिक संघ, राजाराम दिवेकर- अध्यक्ष जनहित ज्येष्ठ नागरिक संघ साईनगर, सतेज चौधरी – अध्यक्ष चंद्रभागा कॉर्नर जेष्ठ नागरिक संघ रावेत,भीमरावजी निकम अध्यक्ष सोमेश्वर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, सुदाम दिवटे व तसेच उपाध्यक्ष साहेबराव देसले यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत व आभार मानले.

Previous articleमायकार शोरुम मध्ये कर्मचारी महिलेचा विनयभंग तर पिडित महिलेला सीईओ सोबत जाण्यासाठी दोन महिलांचा दबाव .?
Next articleसंदीप वाघेरे युवा मंचची दहीहंडी अभूतपूर्व जल्लोषात….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 5 =