Home गुन्हेगारी जगत धक्कादायक प्रकार- गर्भवती महिलेचा विनभंग करत लगट करण्याचा प्रयन्त,व्यवस्थापक चिकुर्डे व उप-अधिक्षक...

धक्कादायक प्रकार- गर्भवती महिलेचा विनभंग करत लगट करण्याचा प्रयन्त,व्यवस्थापक चिकुर्डे व उप-अधिक्षक सय्यद यांच्या विरोधात गुन्हा दाखल..

596
0

दापोडी,दि.२८ ऑगस्ट २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- दिवसेंदिवस महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. त्यात पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड शहर ही मागे नाही असाच एक प्रकार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी १२(एस.टी) या ठिकाणी कर्मचारी गर्भवती महिलेसोबत विनयभंग करत लगट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला लघवी करण्यास गेली तरी तिचा पाठलाग करणे,पिडित महिला गर्भवती असून मध्यवर्ती कार्यशाळेत कामास आहे. तेथील मध्यवर्ती कार्यशाळा व्यवस्थापक आरोपी-दत्तात्रय चिकुर्डे व उप-अधिक्षक सहकारी शकील सय्यद हे दोघेही वरिष्ठ अधिकारी असून पीडित गर्भवती महिलेला जाणून बुजून ञास देत आहेत. तिच्या मनात लज्जा निर्माण होईल अशा प्रकारे तिच्या वारंवार बाजूला जाऊन कोणाशी तरी फोनवर बोलत आहे. असे दाखवून पिडित महिलेला अर्वाच्य शिवराळ भाषेत शिवीगाळी करणे,वासनांद नजरेने भावनेने बघणे,केबिन मध्ये बोलवुन अश्लील भाषेत बोलुन लगट करण्याचा प्रयन्त करणे,तसेच याआधी महिलेला क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अपुरे कपडे देऊन तिच्यावर कारवाई करणे टोमणे मारणे मानसिक त्रास देणे महिलेला पाहून अश्लिल हावभाव करणे असा गैर प्रकार घडत आहे.त्यामुळे सदर पिडित महिला हि तणावात गेली असून पिडित महिलेने राज्य महिला आयोग, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच भोसरी पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार अर्ज दिला होता. मात्र सदर पिडित महिलेची दखल तब्बल एक महिन्यानंतर घेतली व रुग्ण सेवकांच्या मदतीमुळे आरोपी चिकुर्डे व सय्यद यांच्या विरोधात भोसरी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला लैंगिक अत्याचार दक्षता समिती मधील वरिष्ठ पदाधिकारी एका महिलाकडे सदर पिडित महिलेने अर्ज दाखल केल्यानंतर गरोदर असल्याचे पत्र दिल्यानंतर समिती तील महिलेने सदर कागद कोणता दिला आहे. मला समजत नाही अशी वल्गना करत आरोपींना पाठीशी घालून त्यांना सहकार्य सहकार्य केले. जर एक महिलाच दुसऱ्या महिलेची मजबुरी समजू शकत नसेल, तर अशा वेळेस महिला खूप तणावात जातात. सदर पिडित महिलेवर तिच्या घरची जबाबदारी असल्याकारणाने तक्रार करण्यास घाबरत होती. मात्र वासनांद लोकांचे गैरप्रकार थांबायचे नाव घेत नसल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित गर्भवती महिलेने तक्रार दिली, याआधीही कार्यशाळा प्रमुख कारागीर मोहिते यांच्यावरही अशी तक्रार केली होती,त्यामुळे मध्यवर्ती कार्यशाळेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवत असून संपूर्ण शहरात व एसटी महामंडळ कर्मचारी या सर्वांमध्ये आरोपी चिकुर्डे आणि आरोपी सय्यद हे चर्चेचा विषय होत आहे. अशा वासनांद लोकांवर कारवाई केली जावी अशी चर्चा जोर धरत आहे.सदर पिडित महिलेला वारंवार कामावरुन काढुन टाकण्याची धमकी दिली जात आहे.त्यामुळे वरीष्ठ पदाधिकारीच भ्रष्ट आणि वासनांद असल्याने मध्यवर्ती कार्यशाळेचे नाव खराब होत आहे. अशा अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे मात्र वरिष्ठ पदाधिकारी व पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे संपूर्ण शहराचा पदाधिकाऱ्यांच्या प्रशासनाचे राज्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

नेमका काय घडलाय प्रकार
आरोपी दत्तात्रय चिकुर्डे कार्यशाळा व्यवस्थापक व आरोपी शकील सय्यद उप-अधिक्षक यांच्याविरुद्ध उपोषणास बसलेल्या कर्मचारी एम.डी राऊत यांच्या संदर्भात प्रतिष्ठित व्यक्तींची कमिटी सोबत बैठकीत उपस्थित राहिल्याचा राग मनात धरून मध्यवर्ती कार्यशाळा व्यवस्थापक प्रमुख चिकुर्डे व उप-अधिक्षक सय्यद यांनी अधिकच त्रास देण्यास सुरुवात केली.पिडित गर्भवती महिलेला वारंवार तिच्या जवळ जाऊन दुसऱ्या कोणाशी तरी फोनवर बोलत असल्याचा भासवत धमकी देत अर्वाचे भाषेत शिवीगाळ करत वारंवार सतत तोच प्रकार करत पीडित महिलेला टोमणे मारत असल्याने पीडित महिलेला असुरक्षित वाटू लागले.

लय पुढारपण सुचतंय हाय ना मग कशी एकमेकांची आई झ……, नाही नाक घासायला लावलं तर सांगणार नाही,असे बोलून हिणवणे टोमणे मारणे पदाव्यतिरिक्त अधिकची दुसरी कामे सांगणे, सांस्कृतिक कामगार क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता अपुरे मापाचे कपडे देऊन कारवाई करणे, पिडित गर्भवती महिला हीस सतत लघवी येत असल्याने तिच्या मागे जाणे तिचा पाठलाग करणे व तिला धमकावणे तुम्ही इथेच बसून राहायचं कुठे जायचं नाही आमच्या डोक्याला ताण झाला आहे. नाहीतर कामावरून काढून टाकीन अशी धमकी वारंवार देणे, केबिन मध्ये बोलवुन लगट करण्याचा प्रयत्न करणे व मनास लज्जा उत्पन्न होईल, अशी भाषा वापरणे गर्भवती पीडित महिला पंचिंग मशीन कडे जात असताना कार्यशाळा प्रमुख दत्तात्रय चिकुर्डे हे त्या महिलेकडे बघत स्वतःच्या मांडीवर व तोंडावर हात फिरवून अश्लील हावभाव करतात. वरिष्ठांना तक्रार केली असता वरिष्ठांनी पिडित महिलेच्या तक्रारीवर दखल घेतली नाही. महिला लैंगिक अत्याचार दक्षता समितीच्या एका महिला अधिकारी याकडे गरोदरपणाचे कागदपत्र सादर केले असता. त्यांनी कागदपत्र समजत नाही .असे वलगणा करत आरोपींना साथ दिली. एक महिलाच जर दुसऱ्या महिलेला समजून घेत नसेल तर त्या महिलांची कुचंबना होते. होत असलेला त्रास कोणाजवळ सांगायचा त्यामुळे अधिक भीती वाटू लागते पीडित महिला राज्य महिला आयोग व पोलीस आयुक्तालय तसेच भोसरी पोलीस स्टेशन याकडे तक्रार अर्ज देऊनही तिची दखल घेतली गेली नव्हती त्यामुळे अधिकच भयभित झाल्यामुळे काही रुग्णसेवक यांच्या मदतीने स्वतःला सावरत अखेर एक महिन्यानंतर भोसरी पोलीस स्टेशन या ठिकाणी गर्भवती पीडित महिलेची तक्रार दाखल केली गेली.आरोपी वरिष्ठ अधिकारी दत्तात्रय गोपाळराव चिकुर्डे व आरोपी शकील सय्यद यांच्याकडून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिल्यामुळे व पिडित गर्भवती महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. पिडित महिला गर्भवती असल्याने हातबल झाल्यामुळे पीडित महिलेने भोसरी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी चिकुर्डे व सय्यद या विरोधात तक्रार दाखल केली पिडित गर्भवती महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार भा.द.वि कलम ३५४-ड,५०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.

पिडीत महिला- मला २०२१ पासून त्रास होत आहे. मात्र माझ्या घरचे कुटुंब हे माझ्यावर अवलंबून असल्यामुळे मी नाईलाज असल्याने दुर्लक्ष करत काम करत होते. मात्र वरिष्ठ अधिकारीच शोषण करण्याच्या नजरेने पाहत आहेत वारंवार फोनवरती बोलण्याचे नाटक करत शिवीगाळ करत टोमणे मारत होते. पण फोनवर बोलत असल्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष केले मात्र सतत सतत माझ्याजवळ येऊन अर्वाच्य अश्लील भाषेत मनास लज्जा निर्माण होईल अशी भाषा वापरून सतत बोलत असल्यामुळे खात्री झाली की हे मला त्रास देण्याच्या हेतूने वागत आहेत. मला मध्यवर्ती कार्य शाळा व्यवस्थापक प्रमुख दत्ताञय चिकुर्डे व उप-अधिक्षक शकील सय्यद यांच्यापासून जीवाला धोका आहे. मला व माझ्या बाळाला काही झाल्यास व माझ्या कुटुंबातला कोणालाही त्रास झाल्यास यास जबाबदार चिकुर्डे आणि सय्यद व महिला लैंगिक अत्याचार दक्षता समितीतील एक महिला जबाबदार आहे. मी या सर्वांमुळे आणि रोज रोज असा वारंवार प्रकार घडत असल्यामुळे खूप तणावात आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आज माझ्यासोबत घडले आहे उद्या दुसऱ्या कोणत्या महिलेसोबत घडू नये, अशा वासनांद लोकांना जरब बसला पाहिजे प्रशासनाचा धाक असला पाहिजे असे पीडित महिलेने प्रजेचा विकासशी बोलताना सांगितले.

सदर पीडित महिला कास्ट्राईब राज्य परिवहन कामगार संघटना मध्यवर्ती कार्यशाळा मध्ये कार्यरत आहेत त्यामुळे संघटना देखील काय पावले उचलते याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल च्या शहराध्यक्षपदी पिंपळे सौदागर चे सुपुत्र विशाल जाधव यांची निवड
Next article‘मन की बात’ मुळे समाजासाठी काम करण्याची मिळते प्रेरणा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × three =