देहुरोड,दि.०४ एप्रिल २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मागील काही दिवसांपासून शहर पोलीस दलात अंतर्गत बदल्यांची चर्चा सुरू होती. या चर्चांना अखेर विराम मिळाला असून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अंतर्गत बदल्यांचे(दि.३) सोमवारी आदेश दिले.महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांची देहुरोड पोलिस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर सध्या चिखली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांचा चाकण औद्योगिक परिसरातील कारकीर्द नावलौकिक मिळवणारी अशीच राहिली आहे. संपूर्ण चाकण औद्योगिक वसाहतीतील गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आव्हानात्मक काम ज्ञानेश्वर साबळे यांनी करून दाखवले होते. अशीच देहुरोड ठाण्यात ही त्यांची कामगिरी असेल, देहुरोड पोलिस ठाणेच्या वरीष्ट पोलिस निरिक्षक वर्षाराणी पाटील यांचीही बदली वाहतुक शाखेत करण्यात आली आहे.त्याची कामाची पद्धत बघता तेही अशीच धडकेबाज कामगिरी बजावतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता माञ देहुरोड विभागात पोलिस ठाणे अंतर्गत व बाहेर देखील त्यांच्यावर नाराजीचा सुर सर्वांचा होता.देहुरोड ठाणे कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत चालला होता,माञ वर्षाराणी पाटील यांची बदली झाल्याने पोलिसांनी प्रति देहुरोड विभागातील नागरिकांचा विश्वास वाढला आहे.
पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील पोलिस निरीक्षकांच्या अंतेर्गत बदल्यांच्या संदर्भातील आदेश ३ एप्रिल २०२३ रोजी काढण्यात आला. वरिष्ठ निरीक्षकांच्या बादल्यांसह इतरही अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदली झालेले अधिकारी (कुठून कुठे)
दिलीप शिंदे (दिघी ते वाहतूक शाखा)
वर्षाराणी पाटील (देहूरोड ते वाहतूक शाखा)
ज्ञानेश्वर काटकर (गुन्हे शाखा युनिट एक ते चिखली)
मछिद्र पंडीत (गुन्हे शाखा युनिट चार ते दिघी)
वसंत बाबर (चिखली ते महाळुंगे)
ज्ञानेश्वर साबळे (महाळुंगे ते देहूरोड)
सहा अधिकारी बढतीच्या आदेशासाठी ताटकळले.
पोलीस निरीक्षक ते सहाय्यक पोलीस आयुक्त / पोलीस उपअधीक्षक पदावर बढतीची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र त्याबाबतचे राज्याच्या गृह विभागाने आदेश काढले नाहीत. त्या यादीमध्ये पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील सहा पोलीस निरीक्षकांची नावे आहेत. या अधिकाऱ्यांची कागदपत्रांची पूर्तता देखील झाली आहे. मात्र गृह विभागाकडून याबाबत आदेश न काढले गेल्यामुळे हे अधिकारी बढतीसाठी ताटकळले आहेत. हे अधिकारी बढतीवर गेल्यानंतर त्यांच्या जागी इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.