Home पुणे सावरकर गौरव यात्रा आयोजन व पक्ष संघटनेचा आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी...

सावरकर गौरव यात्रा आयोजन व पक्ष संघटनेचा आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी आढावा घेतला

127
0

चिंचवड,दि.०५ एप्रिल २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी आमदार झाल्यानंतर प्रथमच मतदारसंघातील भाजपचे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व माजी नगरसेवकांची बुधवारी (दि. ५) बैठक घेतली. त्यांनी या बैठकीत पिंपरी-चिंचवडमध्ये काढण्यात येणारी सावरकर गौरव यात्रा, पक्षाचा वर्धापन दिन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नियोजनाचा आणि बुथ सक्षमीकरण अभियानाचा आढावा घेतला.

काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान केला जातो. त्यामुळे भाजप-शिवसेना महायुतीने राज्यभर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये देखील ९ एप्रिल रोजी रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते तापकीरनगरपर्यंत सावरकर गौरव यात्रा काढली जाणार आहे. त्याअनुषंगाने आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी पहिल्यांदाच पक्ष संघटनेची पिंपळेगुरव येथील जनसंपर्क कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी माजी महापौर माई ढोरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, भाजपचे शहर सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे, प्रदेश निमंत्रित सदस्य व चिंचवड विधानसभा प्रभारी संतोष कलाटे, महिला मोर्चा शहराध्यक्ष उज्वला गावडे, सांगवी-काळेवाडी मंडलाध्यक्ष विनोद तापकीर यांच्यासह चिचंवड विधानसभेतील भाजपचे सर्व माजी नगरसेवक, प्रदेश, जिल्हा व मंडल पदाधिकारी तसेच सर्व शक्तीकेंद्र प्रमुख उपस्थित होते.

बैठकीला सुरूवात करण्यापूर्वी पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड-किवळे मंडल व सांगवी-काळेवाडी मंडलाची स्वतंत्र बैठक घेतली. चिंचवड विधानसभा मतदारसंघात पक्षामार्फत राबवण्यात येणाऱ्या आगामी कार्यक्रमांची माहिती व त्यांचे नियोजन करून ते यशस्वीपणे राबवण्याबाबत त्यांनी सर्वांना सूचना केल्या. ६ एप्रिल रोजी पक्षाचा स्थापना दिवस, ९ एप्रिल रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, तसेच ३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय ‘मन की बात’ चा १०० व्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सर्वांना माहिती दिली. हे सर्व कार्यक्रम उत्साहात राबवावेत, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले.

Previous articleBreaking News:: देहुरोड चे वरीष्ठ पोलिस निरिक्षक वर्षाराणी पाटील यांची बदली तर नवे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे
Next articleसंस्थेचे कामकाज नियमानुसार विरोधकांचे आरोप बिनबुडाचे-अध्यक्ष बबनराव झिंझुर्डे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen + thirteen =