Home ताज्या बातम्या माता रमाई स्मारकाचे भूमिपूजन १४ एप्रिलच्या दिवशी करण्याची समितीची मागणी

माता रमाई स्मारकाचे भूमिपूजन १४ एप्रिलच्या दिवशी करण्याची समितीची मागणी

63
0

स्मारक समिती नक्की कोणाची ? कोण करतय संभ्रम निर्माण,एकाच नावाने दोन समित्या जनते मध्ये संभ्रम निर्माण होत आहे.त्यामुळे स्मारक समिती ज्या साठी निर्माण झाली तेच ध्येय गाठले पाहिजे,तेच काम समिती कडुन व्हावे अशी जोरदार सर्व जनतेत चर्चा आहे.

पिंपरी,दि.२८ मार्च २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- माता रमाई स्मारक समिती. पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने २०१९ पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे त्यागमूर्ती माता रमाई स्मारक उभे राहावे यासाठी समितीच्या वतीने मागणी केली जात आहे. याच विषयावरती पिंपरी चिंचवड शहरांमध्ये अनेक वेळा माता रमाई स्मारक समितीच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिका समोर मोठे जनआंदोलन.. उपोषण करण्यात आले आहेत.तसेच पिंपरी चिंचवड शहरांमधील तमाम बहुजन बांधवांची मागणी आहे . १४ एप्रिल २०२३रोजी. म्हणजेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिनी. पिंपरी येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पाठीमागील जागेवर माननीय आयुक्त साहेब. आपल्या शुभ हस्ते जागेचे भूमिपूजन करण्यात यावे. असे पिंपरी चिंचवड शहरातील आंबेडकर अनुयायांची मागणी आहे.माता रमाई स्मारक समिती पिंपरी चिंचवड शहर यासाठी सतत आग्रही आहे.शिवसेना,राष्र्टवादी,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दापोडी, भारतीय रिपब्लिकन फेडरेशन,रिपब्लिकन सेना पिंपरी चिंचवड शहर, हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशन पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील हाद्दीतील चारही दिशाच्या संघटना पदाधिकारी व चळवळीतील कार्यकर्ते सर्वपक्षीय व संघटना मंडळे सर्वांनी निवेदने दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतितिरिक्त आयुक्त, कार्यालय – १ चे  प्रदीप जांभळे-पाटील यांनी सर्व पदाधिकारी व संघटनांना आश्वासित करत सर्वांशी सकारात्मक चर्चा केली लवकरच वरिष्ठांशी व सहकारी यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले,यावेळी समिती प्रमुख धुराजी शिंदे,गोपाळ मोरे, गंगा धेंडे,दत्ताभाऊ गायकवाड, सुनील गायकवाड, अरुण मैदाळे,अ‍ॅड.मिलिंद कांबळे, युवराज भासकर, राहुल सोनवणे, उमेश गायकवाड, शरद कांबळे, अनिल मखरे, हौसराव शिंदे, सचिन जाधव, राजू गायकवाड, विनोद सरोदे,प्रकाश बुक्‍तर, माऊली बोराटे,नितीन कसबे,शिवशंकर उबाळे, राजू गायकवाड, रामभाऊ पवार, कुंदा कदम, सुमन जयस्वाल, छाया क्षीरसागर, गुलजार कुरेशी, सुरज शिखरे,शांताराम खुडे, लालासाहेब गायकवाड आदि पदाधिकारी व चळवळीतील सुमारे१५० कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleविकासनगर-किवळे…. जयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी संतोष म्हस्के व प्रसिद्धी प्रमुख पदी विकास कडलक यांची निवड
Next articleBreaking News:: देहुरोड चे वरीष्ठ पोलिस निरिक्षक वर्षाराणी पाटील यांची बदली तर नवे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five + 17 =