Home ताज्या बातम्या विकासनगर-किवळे…. जयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी संतोष म्हस्के व प्रसिद्धी प्रमुख पदी विकास...

विकासनगर-किवळे…. जयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी संतोष म्हस्के व प्रसिद्धी प्रमुख पदी विकास कडलक यांची निवड

127
0

किवळे,दि.२६ मार्च २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध संयुक्त जयंती महोत्सव समिती विकास नगर किवळे देहूरोड विभाग यांची दरवर्षी प्रमाणे वार्षिक जयंती महोत्सव समितीचे कार्यकारणी जाहीर करण्यात आली. सालाबाद प्रमाणे यावर्षी जयंती महोत्सव होणार असून आंबेडकर अनुयायांची आज २६ मार्च २०२३ रोजी मराठी प्राथमिक शाळा विकास नगर येथे बैठक घेण्यात आली या जयंती बैठकीत विकास नगर किवळे देहुरोड विभागातील जयंती महोत्सव समितीतील जुने नवे सर्व पदाधिकारी व आंबेडकर अनुयायी उपस्थित होते जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात वैचारिक प्रबोधन व कार्यक्रम होणार असुन लवकर दुसरी बैठक घेऊन कार्यक्रम पञिका जाहीर केल जाईल असे सल्लागार समितीने सांगितले.सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.आज दरवर्षी प्रमाणे जयंती महोत्सव समितीची कार्यकरणी जाहीर झाली निवड झालेल्या सर्व पदाधिकार्‍याचे अभिनंदन आंबेडकर अनुयायांकडून केले जात आहे.दर वर्षी एकमेव समिती आहे जी जंयती मोठ्या प्रमाणात साजरी करते,त्यामुळे सर्वांचे लक्ष कार्यक्रम पञिका कधी जाहीर होते या कडे लक्ष लागुन आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध संयुक्त जयंती महोत्सव समिती,विकासनगर-किवळे,देहुरोड विभाग जंयती महोत्सव समीतीची

कार्यकरणी जाहिर खालील प्रमाणे

सल्लागार-दिलीप कडलक
सल्लागार-सिद्धार्थ चव्हाण
सल्लागार-सुनिल कडलक
सल्लागार-धर्मपाल तंतरपाळे
सल्लागार-बापु गायकवाड
सल्लागार-शिवाजी भंडारे
अध्यक्ष-संतोष प्रभाकर म्हस्के
प्रसिद्धी प्रमुख-विकास कडलक
उपाध्यक्ष-संदिप कडलक
कार्यध्यक्ष- मधुकर रोकडे
सहकार्यध्यक्ष-श्रीकांत ढवळे
खजिनदार- वैभव कांबळे
सह खजिनदार-सर्जेराव शिंदे
सचिव-राजेंद्र रामराजे
सहसचिव-मुकुंद कांबळे
हिशोब तपासणीस-राजु गायकवाड

Previous articleपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब क्षेञीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाकडून भगव्या झेंड्याचा अवमान गंभीर बाब
Next articleमाता रमाई स्मारकाचे भूमिपूजन १४ एप्रिलच्या दिवशी करण्याची समितीची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × one =