Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब क्षेञीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाकडून भगव्या झेंड्याचा अवमान गंभीर...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब क्षेञीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाकडून भगव्या झेंड्याचा अवमान गंभीर बाब

107
0

चिंचवड,दि.२१ मार्च २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- भगवा रंग हा हिंदू धर्मात पवित्र रंग मानला जातो . हिंदू पौराणिक कथेनुसार, केशर (किंवा केशर) हा सूर्यास्त (संध्या) आणि अग्नीचा रंग आहे जो त्याग, प्रकाश आणि मोक्ष शोधण्याचे प्रतीक आहे.मराठा साम्राज्यासह सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अनेक हिंदू राज्ये आणि राजवंशांच्या ध्वजांवर भगवा रंग होता . आधुनिक काळात भगव्या ध्वजाचा भगवा रंग हिंदू आणि हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करतो.त्याच भगव्या झेड्यांचा अवमान केला जात आहे.अशी बाब पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या व क्षेत्रीय कार्यालयात गेल्यावर निदर्शनास आली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब क्षेत्रे कार्यालयात अतिक्रमण विभागाकडून भगव्या झेंडाचा आवमान केला जात आहे. सदर अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमणाची कारवाई करत असताना शिवजयंती निमित्त लावलेले भगवे झेंडे हे अतिक्रमण विभागाने ब प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये कचऱ्यासारखे खाली टाकले असून भगव्या झेंड्यालाही कचऱ्यात फेकल्यासारखे फेकले आहे. जेणेकरून अतिक्रमण विभागाने भगवा झेंडा असेल किंवा निळा झेंडा असेल कोणतेही झेंडे काढून आणल्यास त्याला एकत्र गट्टे बांधून त्याला व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे मात्र तसे न करता ब क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी मनमानी कारभार आणि जनतेचे कोणत्याही भावना याची कोणतीही कदर न करता अतिक्रमांणाची कारवाई करत असताना काढून आणलेले भगवे झेंडे खाली उलटे सुलटे कसही करून टाकले आहेत. त्यावर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करून आलेले वस्तू देखील भंगार जसे एकत्र गोळा केले जाते तसेच झेंडा सहित ते गोळा करून टाकले आहे. राजेंद्र तरस यांच्या हंडा मोर्चाच्या निमित्ताने ब क्षेत्रीय कार्यालयात गेल्या असता हे प्रजेचा विकास व इतर मीडिया प्रतिनिधींच्या निदर्शनास आले. त्यानंतर अतिक्रमण विभागांच्या अधिकारी यांच्याशी भेट घेण्याचा प्रयत्न केला असता कोणीही भेटले नाही. व भ्रमणध्वनी द्वारे त्यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन देखील उचलण्यास टाळाटाळ केली. याचा अर्थ त्यांना जनतेच्या भावनांची कोणतीही कदर नाही असे अधिकारी जर असतील तर नाहक जातीय दंगली घडण्याचा प्रयत्न घडला जाऊ शकतो, अशा पदाधिकाऱ्यांमुळे आज भगव्या झेंड्याचा अहवेलना तर उद्या निळ्या झेंड्याचा अवमान असा प्रकार दिसून येत आहे. अस्ताव्यस्त पडलेल्या अतिक्रमणच्या कारवाईतून आणलेल्या वस्तू ह्या देखील व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. त्यात जनतेच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत किंवा कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत. याची काळजी घेणे ही गरजेचे आहे. मात्र अशी कोणतीही काळजी न घेता उघड्यावरच सर्व वस्तू टाकून त्यावर अशा प्रकारे भगव्या झेंड्याचा अवमान केला जात आहे एकीकडे हिंदू राष्ट्र बनवण्याकडे भाजप व सनातन यांचा कल आहे तर त्याच धर्तीवर ज्या भगवा झेंडा घेऊन हिंदुराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याच धर्तीवर भगव्या झेंडाचा अपमान केला जात आहे यावर पालिका आयुक्त शेखर सिंह काही कारवाई करतील का? जनतेच्या भावना लक्षात घेत कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत. याकडे पालिका पदाधिकारी लक्ष देतील का जसं भगव्या झेंड्याला फाट्यावर मारले तसे नागरिकांच्या भावनालाही फाट्यावर मारण्याचे काम ब प्रभागातील अतिक्रमण विभाग करत आहे.

भगवा झेंडा मराठा साम्राज्य चा भगवा ध्वज
भगवा ध्वज हा भारताचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ध्वज आहे. हे हिंदू आणि बौद्धांच्या महान प्रतीकांपैकी एक आहे . त्याचा रंग भगवा आहे . ते त्याग, त्याग, ज्ञान, पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे. हे भारतीय संस्कृतीचे चिरंतन वैश्विक प्रतीक आहे
भगवा ध्वज हिंदू संस्कृती आणि बौद्ध संस्कृती आणि धर्माचे चिरंतन प्रतीक आहे. सर्व मंदिरे आणि आश्रमांमध्ये हा ध्वज फडकवला जातो. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा झेंडा होता . हा ध्वज भगवान श्री राम , भगवान श्री कृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांवर फडकवण्यात आला .

छत्रपती शिवाजींच्या मते, ध्वजाचा भगवा रंग हा उगवत्या सूर्याचा रंग आहे ; हा अग्नीच्या ज्वाळांचा रंग आहे . उगवत्या सूर्याचा रंग आणि तो ज्ञान, शौर्याचे प्रतीक मानला जात होता आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी त्याला सर्वांसाठी प्रेरणास्थान मानले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सर्वात पवित्र भगवा ध्वज आपला गुरू मानला आहे . संघाच्या शाखांमध्ये हा ध्वज फडकवला जातो, त्याची पूजा केली जाते आणि या ध्वजाचा साक्षीदार मानून सर्व कार्यकर्ते राष्ट्रसेवेची, लोकांची सेवा करण्याची शपथ घेतात. आणि भगव्या ध्वजाने राष्ट्रध्वज तिरंग्याप्रमाणे धर्मध्वजाचा मान राखला पाहिजे , असे त्यांना समजावून सांगितले आहे.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर भगव्या ध्वजाला राष्ट्रध्वज घोषित करण्यात यावे, असा संघ आणि हिंदू संघटनांचा आग्रह होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य कार्यालयात नागपुरात नेहमीच भगवा ध्वज फडकवला जातो ,
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हिंदुत्वावरून भाजपवर टीका केल्यानंतर फडणवीस यांनी याच मुद्द्यावरून शिवसेनेला फटकारले होते. काही जणांनी भगवा झेंड्याच्या नावाखाली वेगळे कामे सुरू केले आहे परंतु, आता या भगव्या झेंड्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण स्वीकारली आहे. कारण भगवा हा शिवछत्रपतींचा आहे, शिवछत्रपती महाराज हे महाराष्ट्राचा आदर्श आणि दैवत आहे. त्यांच्या झेंड्याचा अपमान करणाऱ्यांना आता समाजामध्ये कोणतेही स्थान उरलेले नाही, अशा शब्दात फडणवीसांनी शिवसेनेवर टिका केली होती.

Previous articleपगार मागितला म्हणून साफसफाई करणाऱ्या महिलेला जबरी मारहाण
Next articleविकासनगर-किवळे…. जयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी संतोष म्हस्के व प्रसिद्धी प्रमुख पदी विकास कडलक यांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

six + 8 =