Home ताज्या बातम्या पगार मागितला म्हणून साफसफाई करणाऱ्या महिलेला जबरी मारहाण

पगार मागितला म्हणून साफसफाई करणाऱ्या महिलेला जबरी मारहाण

184
0

निगडी,दि.२१ मार्च२०२३ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-
देहुरोड एमबी कॅम्प मधील साफसफाई करणारी पीडीत महिला निगडी येथील सिटी प्राईड बिल्डींग मध्ये पहिल्या मजल्यावर एस आर सी ट्रान्सपोर्ट दुकानांमध्ये गेले तीन महिन्यापासून साफसफाई करण्याचे काम करतात व त्याचा पगार मागितल्याच्या कारणावरून आरोपी हर्षद खान यांनी सदर महिलेला जबर मारहाण व शिवीगाळ केली आहे.पीडीत महिलेने निगडी पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिली असता पोलिसांनी एनसी दाखल(अदखलपाञ गुन्हा) केली आहे.आरोपी वरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे मागणी दिपक कांबळे यांच्याकडून केली जात आहे पोलिसांनी भादवि कलम 323 504 506अंतर्गत अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे
एम आय एम चे शहर उपाध्यक्ष दीपक कांबळे यांनी सदर बाबीत घटनेवर लक्ष केंद्रित करत पोलीसच आरोपीला पाठबळ देत आहे असा आरोप केला आहे व सदर महिला वाल्मिकी समाजाचे असून आरोपीने भंगी असा शब्द प्रयोग करत शिवीगाळ केली आहे त्यामुळे आरोपी वरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच आयपीसी 354 307 हे गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

 

Previous articleपुण्यात जी-20 विद्यापीठ कनेक्ट:: भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे – हर्षवर्धन शृंगला
Next articleपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब क्षेञीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाकडून भगव्या झेंड्याचा अवमान गंभीर बाब

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × 3 =