किवळे,दि.१० नोव्हेंबर २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मेडिकल मधून औषध घेताना करा काळजीपूर्वक विचार औषध तपासुनच द्या लहान मुलांना, किवळे मुकाई चौक या ठिकाणी वाघाडे वाईन शॉप च्या बाजूला असणारे अॅपल केमिस्ट अँड ड्रग्स या मेडिकल मधून विकली जातात बनावट औषधे आणि तारीख संपत आलेले औषध व काही औषधांना तर चक्क लेबल बदली केल्याचे आढळुन आले आहे. मेडिकल मध्ये येऊन तपासले असता युनिझा हेल्थकेअर या कंपनीच्या औषधांमध्ये फंगस सारखे प्रकार आढळून आले आहे असे औषध आपल्या लहान मुलांना पाजल्यास मुलांच्या जीवाला धोका सांभावु शकतो तसेच या कंपनीचे किंवा दुसऱ्या कंपनीचे औषधांमध्ये फंगस आढळल्यास त्याच्यामुळे ही आपल्या सर्वांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो अशा मेडिकल वाल्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे त्याचबरोबर यांना सप्लाय करणारे सप्लायर यांचीही चौकशी करून कंपनीवरही गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना माथाडी कामगार आघाडीचे शहराध्यक्ष सचिन शिंगाडे यांनी त्यांच्या लहान मुलांसाठी औषध विकत घेतलं होतं त्या औषधांमध्ये फंगस निघाल्याने त्यांनी तात्काळ मेडिकल मध्ये संपर्क साधला.तर मेडिकल वाल्याने औषध बदलून दिले. मात्र दुसऱ्या औषधांमध्येही तसेच जाणवल्याने मेडिकल मध्ये पञकार व मनसे चे पदाधिकारी यांनी मेडिकल मधील औषध तपासले असता अनेक औषध फगस सारखी मिळुन आली.त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे सचिन शिंगाडे तक्रार करणार आहेत व तसेच या मेडिकल मधील सर्व औषध प्रशासनाकडून तपासली जावे व सप्लाय करणाऱ्यांकडेही लक्ष देऊन त्यांच्या गोडवानामध्येही असणारे औषधे तपासावेत व त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावी अशी विनंती अन्न औषध प्रशासन विभागाकडे प्रसार माध्यमांच्या द्वारे सचिन शिंगाडे यांनी केली आहे. मेडिकलच्या मॅनेजरने डिस्ट्रीब्यूटर आणि एमआर दोघांनाही फोन केले मात्र त्यांनी मेडिकलवर येण्यास टाळाटाळ केली त्यातील एका व्यक्तीने तर डायरेक्ट बोलताना तुम्हाला काय करायचे करून घ्या आमच्या कंपनीचं काय वाकड होत नाही असे शब्द उच्चारले. हे औषध जे आहे ते युनीझा हेल्थकेअर एलएलपी c401 गणेश मेरिडियन अपोजिट गुजरात हायकोर्ट एस जी हायवे अहमदाबाद गुजरात या ठिकाणची कंपनी आहे व पुण्यामध्ये एरंडवना या ठिकाणी या औषधांचा स्टॉप केला जातो व तेथून वितरण केले जाते असे मेडिकल वाल्याकडून माहिती मिळाली. मेडिकल मालकाचे नाव नरेश कुमार प्रजापति असे आहे व त्या ठिकाणी कामाला असणाऱ्या मुलाचे नाव प्रवीण वैष्णव असे आहे तर औषध पुरवणाऱ्या योनीच्या कंपनीच्या डिस्ट्रीब्यूटर चेतन भोर व वसीम पूर्ण नाव माहित नाही अशा लोकांचे भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिले मेडिकलवर या म्हटल्यावर मेडिकल वर येण्यास नकार दिला.
आपल्या लहान मुलांना औषध देताय काळजीपूर्वक द्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन जरी आपण औषध देत असाल तरी औषध बनवणाऱ्या कंपन्या आणि त्यांची औषधे तपासली पाहिजे अशाच प्रकार मुकाई चौक केवळ या ठिकाणी घडला आहे असा अनेक ठिकाणी ही घडू शकतो याची आपण सर्वांनी खबरदारी घ्यावी