मावळ-शिरगाव, दि.२९ नोव्हेंबर २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मावळ तालुक्यातील शिरगाव येथे जातीवादा केलेल्या आरोपीन वर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीनी जामीनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला होता त्यावर २४ नोव्हेंबर सुनावणी झाली.जातीवादी माजी सरपंच तथा साईबाबा चॅरीटेबल ट्रस्ट शिरगाव ( ता. मावळ, पुणे) येथील विश्वस्त उस्मान दगडू शेख व जहांगीर डांगे यांच्यावरील ॲट्रॉसिटी व इतर गुन्ह्यातील आरोपी असलेला गुन्हेगार यांचा अटकपूर्व जामीन मुंबई हायकोर्टाने फेटाळला असून पोलीस आरोपींच्या शोधात असुन अद्याप आरोपी माञ फरार आहेत.
शिरगाव येथील जमीन हडपण्याचा जाब विचारण्यास गेलेल्या शेतक-यास जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी शेतकरी लिंबाजी गायकवाड यांनी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यातील मुख्य आरोपी उस्मान शेख व जहांगीर डांगे (दोघे रा. शिरगाव, ता. मावळ, पुणे) यांचा जामीन मुंबई हायकोर्टाने दि. २४ रोजी फेटाळला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.३(२)(va)कलम वाढ करत. ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत सारंग व्हि.कोतवाल,जे कोर्टाने जामीन अर्ज बाद केला.फिर्यादीच्या बाजूने हायकोर्टात अटकपुर्व जामीना साठी अॅड. दिगजमान मिश्रा यांनी बाजू मांडली होती.
नेमके काय घडले होते प्रकरण सविस्तर…..
पिडित शेतकरी लिंबाजी रामभाऊ गायकवाड वय ५६ वर्षे, व्यवसाय शेती रा. शिरगाव ता. मावळ जि. पुणे येथे पत्नी व मुलगी राहण्यास असुन शिरगाव ता. मावळ जि. पुणे येथील गट नं. १२७ याशी पोटखराव्यासहित एकुण क्षेत्र ०१ हे. ५४ आर यापैकी क्षेत्र ०० हे. ५० आर ही मिळकत.लिबांजी गायकवाड यांची वडिलोपार्जित मालकी हक्काची व प्रत्यक्ष ताबे वहिवाटीची आहे. सदरची मिळकत ही गाव मौजे शिरगाव येथील शेतजमिन आहे. सदर मिळकतीमध्ये ‘लिबांजी गायकवाड यांचे राहते घर असुन, इतर क्षेत्रात शेती पॉलीहाउस अंतर्गत शेती करतात. लिंबाजी गायकवाड व जातीवादी उस्मान शेख यांच्या सोबत पुर्वीपासुन ओळख होती जातीवादी उस्मान शेख हे प्लॉटिंगचा व्यवसाय करतात.
सन २०१३ मध्ये त्यांची बहिण बबुबाई यांनी शर्तभंग बेकायदेशीररित्या करून दिलेले खरेदीखत रदद् करण्याकरिता वडगाव येथील मे. दिवाणी न्यायालयात दिवाणी मुकदमा दाखल केला असून सदरचा दावा आजपर्यंत वडगाव मावळ येथील मे. दिवाणी न्यायालयात न्याय प्रविष्ट आहे. लिबांजी गायकवाड मे. वडगाव मावळ न्यायालयात रे. म. नं. ७२/२०१३ अन्वये वरील नमुद प्रमाणे दावा चालू असताना दाव्यातील प्रतिवादी चरंतीमठ यांनी परस्पर लिंबाजी गायकवाड यांची वरील मिळकत इसम नामे १) उस्मान दगडू शेख २) समीर शीरील मुनतोंडे ‘रा. सर्वे नं. ४४ सोमनाथ नगर, वडगाव शेरी ता. हवेली जि. पुणे ३) अशोक लक्ष्मण कांबळे यांना विक्री केली त्या कारणाने आरोपी जातीवादी उस्मान दगडू शेख व इतर २ यांना दाव्यात पक्षकार म्हणून सामिल केले त्याप्रमाणे दि. ०७/०१/२०२२ रोजी खटल्याचे काम चालू असताना मे. न्यायालयाने सदर दाव्यामध्ये आरोपी उस्मान दगडू शेख यांना प्रतिवादी केले असता त्यांनी सदर खटल्यामध्ये कैफियत व कागदपत्रे दाखल केली. सदरची कागदपत्रे प्रतिवादी यांनी स्विकारली असता त्यांचे निदर्शनास आले की, आरोपी उस्मान दगडू शेख यांनी लिंबाजी गायकवाड यांची वरील नमुद गट मिळकतीमधील उर्वरीत ०० नं. १९७ या हे. ५० आर या वडिलोपार्जित मिळकत क्षेत्राची लिंबाजी गायकवाड यांची खोटी सही करून तयार करण्यात आलेली बनावट खरेदी पावती दाखल केली, सदर बनावट खरेदी पावती मध्ये सर्व आरोपी उस्मान दगडू शेख, अशोक लक्ष्मण कांबळे, जहांगीर राजु डांगे या इसमानी एकत्रित येवुन संगनमताने लिंबाजी गायकवाड यांच्या नावाची खोटी खरेदीची पावती तयार केली व लिंबाजी गायकवाड यांचे नाव खरेदी पावतीमध्ये देणार असे नाव दर्शवुन लिंबाजी गायकवाड यांची खाटी सही सदर पावतीमध्ये केलेली आहे. सदर तथाकथित व्यवहाराबाबत आजपर्यंत लिंबाजी गायकवाड यांना कोणत्याही प्रकारचे पैसे प्राप्त झालेले नाही व गायकवाड यांचे आरोपी उस्मान दगडू शेख यांचेशी आजपावेतो कोणत्याही प्रकारचा व्यवहार केलेला नव्हता व नाही. त्यांनी सदर खरेदी पावतीवर लिंबाजी गायकवाड यांची मराठीमध्ये खोटी सही केलेली आहे. लिंबाजी गायकवाड यांचे म्हणणे आहे की, त्यांनी आजपर्यंत इंग्रजीमध्येच सही करत आलेले आहे. आरोपी उस्मान दगडू शेख यांनी माझी फसवणुक केली आहे, मे. न्यायालयामध्ये खोटी कागदपत्रे दाखल करून मे. न्यायालयाची देखील दिशाभुल व फसवणुक केलेली आहे.आरोपी उस्मान दगडू शेख व फिर्यादी हे एकाच गावातील रहिवाशी असल्याने एकमेकांशी परिचीत होते. सदरची बाब लिंबाजी गायकवाड यांना समजताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला,गायकवाड हे सज्ञान झाल्यापासून आजपर्यंत इंग्रजीमध्येच सहया करत आलेले आहेत असे त्यांचे ठाम म्हणने आहे व आजपर्यंत कोणत्याही कागदपत्रांवर मराठीमध्ये सही केलेली नव्हती व नाही सदरच्या खरेदीपावतीवर आरोपी उस्मान दगडू शेख यांनी माझे नावाची बनावट सही केलेली आहे. सदरची पावती पाहताच माझे लक्षात आले की, त्यांची बनावट सही इतर कोणी नाही तर त्यांचेच परिचयातील असलेले आरोपी उस्मान दगडू शेख यांनीच केलेली आहे,
लिंबाजी गायकवाड हे दिनांक ०१/०२/२०२२ रोजी ११.३० ते १२.०० वाचे सुमा. साई मंदिराचे पाठीमागे आरोपी उस्मान शेख यांचे घराजवळ जावुन गट नं. १९७ यापैकी ५० आर या वडिलोपार्जित मिळकत क्षेत्राची माझी खोटी सही करून तयार करण्यात आलेली बनावट खरेदी पावती का केली याबाबत आरोपी उस्मान दगडू शेख यांना विचारणा केली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देवुन जिवे मारण्याची धमकी दिली व गायकवाड ह्यांना जातीवरून घाणेरड्या शिव्या दिल्या आणि “माझा मुलगा पोलीस पाटील आहे, तुझी लायकी गावाबाहेर रहायची आहे, तु महारडया, ध्यालपाटाचा आहे, तुझी घरात यायची लायकी नाही, जास्त शाहणपणा केला, व पोलीसात तक्रार दिली तर तुला या गावातुन गायब करून जिवंत सोडणार नाही. मी साईबाबा चॅरीटेबल ट्रस्टचा विश्वस्थ आहे, तुझी मंदिरात यायची लायकी नसुन तुला तुझ्या मित्र परिवारासकट खल्लास करीन, तुझी गट नं. १९७ मधील असलेली शेती माझ्या नावावर रजिष्टर खरेदीखताने करून दे” अशी धमकी आरोपी उस्मान दगडू शेख यांनी दिली. “मी तुझ्या समाजातल्या गणपत गायकवाड, अशोक गायकवाड, नाना गायकवाड व इतर रामोशी समाजातल्या लोकांच्या जमीनी लुबाडलेल्या आहेत हे तुला माहित असुन तुझी माझ्या दारात यायची हिंमत झाली कशी, मी तुला त्यांच्याप्रमाणेच गावाबाहेर हाकलुन काढण तु माझ्या दी लागू नकोस” असे अपशब्द वापरून लिंबाजी गायकवाड यांचा जातीवरून अपमान केला त्यावेळी सदर ठिकाणी नानासाहेब रामराव घरत वय ४३ वर्ष है इसम हजर होते तसेच गायकवाड यांची मिळकत हडप करण्याची आरोपीनी धमकी दिली.
१) उस्मान दगड शेख २) समीर शीरील मुनतोंडे ३) अशोक लक्ष्मण कांबळे ४) जहांगीर राजु डांगे हे सतत ७/१२ जमीन खरेदी विक्री व्यवहारांची कामे करत असतात. सध्या शिरगाव व इतर पंचक्रोषीतील भागात जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत व जमिनीची किंमत साधारण १० ते १५ लाख रुपये प्रति गुंठा या भावाने खरेदी विक्री चालू आहे. याबाबतची लालसा आरोपी उस्मान दगडू शेख यांना सुटल्याने त्यांनी फिर्यादी लिंबाजी गायकवाड यांची खोटी खरेदी पावती तयार त्यावर खोटी सही करून एकंदरीत ५,००,००,०००/रु (पाच कोटी फक्त) या किमतीची शेतजमिन मिळकत लुबाडण्याचा प्रयत्न केलेला आहे व सदरची बनावट खरेदी पावती मे. न्यायालयात दाखल करून आरोपीनी मे. न्यायालयाची देखील दिशाभुल केलेली आहे.
आरोपीनी वडिलोपार्जित मिळकत बनावट खरेदी पावती तयार करून त्यामध्ये लिंबाजी गायकवाड नावाची बनावट सही करून वडिलोपार्जित मिळकत हडपण्याचा, लुबाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणुन गायकवाड यांनी आरोपी विरुध्द कायदेशिर तकार दिली.गुन्हा रजि.नं.०२६१/२०२२ भा.द.वि कलम ४२०,४६७,४६८,४७१,५०४,५०६,अनुसुचित जातीजमाती अत्याचार ३(१)r, ३(१)s,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.तेव्हा पासुन आरोपी फरार असुन त्यातील आरोपी समीर मुनतोडे व अशोक कांबळे यांना जामीन मिळाला माञ आरोपी उस्मान शेख व आरोपी जहांगीर डांगे यांनी अटक पुर्व जामीन अर्ज दाखल केला होता.तो मंबई हायकोर्टाने फेटाळला.