किवळे-रावेत,दि.०६ नोव्हेंबर २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- अर्बन गेटवे हॉटेलचे मालक चालक निखिल भोंडवे व शैलेश काटे यांच्याशी प्रजेचा विकास चे प्रतिनिधी नी संवाद साधला असता त्यांनी त्वरीत स्वता बॅनर काढुन घेतला.बॅनर लावण्याचे काम बॅनर बांधणार्यांना दिले होते.माञ बॅनर बांधणार्यांनी बॅनर बांधला,सकाळी उठल्यावर प्रजेचा विकास वर बातमी पाहिली.व त्वरीत बॅनर बांधणार्याना सांगितले तो बॅनर चुकीच्या ठिकाणी का लावला म्हणुन खुप रागवले.कारण जनते मध्ये आमच्या बदल समाजातील लोकांन मध्ये गैरसमज होतील.म्हणुन बॅनर काढुन घेतला व बॅनर बांधणार्यांना परत कुणाचेच कोणत्याही महाषुरषांच्या बोर्ड वर किंवा दिशा दर्शक फलक वर कुणाचेहि बोर्ड लावायचे नाही तशी तंबी दिली.झालेल्या प्रकारा बदल अर्बन गेटवेच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली व अशा सर्व फ्लेक्स वाल्यांना व त्यांच्या मालकांना बॅनर लावणाऱ्या त्यांच्या मुलांना कोणत्याही महापुरुषाच्या बोर्डवर बॅनर लावू नये अशा सुचना सर्व बॅनर बनवणार्यांनी दिली पाहिजे.
सदर प्रकार हा विकास नगर रिक्षा स्टॅण्ड छञपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी घडला होता.बातमी लागताच पोलिस प्रशासन,महापालिका प्रशासन यांनी ही दखल घेत घटना स्थळी पहाणी केली.माञ प्रशासन पोचण्या आधीच अर्बन गेट वे हाॅटलेचे चालकांनी बोर्ड काढुन घेतले होते.त्वरीत बोर्ड काढल्याने वातावरण त्वरीत निवळले गेले असा प्रकार पुन्हा होऊ नये या साठी प्रशासनानी दखल घेत बॅनर बनवणारे यांनाच नोटीस द्यावी म्हणजे असे प्रकार घडणार नाहीत.