Home ताज्या बातम्या विकास नगर- छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या नावाचा बोर्डावर पुन्हा बॅनर...

विकास नगर- छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या नावाचा बोर्डावर पुन्हा बॅनर बांधुन केली जातीय महाराजांची विटंबना

129
0

विकासनगर,दि.०६ नोव्हेंबर २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- विकास नगर किवळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या नावाचा लोखंडी बोर्ड लावलेला असताना विविध पक्ष संघटना,व्यापारी त्यावरच बॅनर लावतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव असणारा बोर्ड झाकला जातो.पुन्हा एकदा अर्बन गेट वे हाॅटेल(व्हेज आणि नाॅनव्हेज) या हाॅटेल चालकांने खोडसाळ पणा करत बोर्ड लावुन महाराजांचा आपमान केला गेला आहे.त्यावर पोलिस प्रशासन काय कारवाही करणार का? व महापालिका प्रशासन काही कारवाई करणार का?,आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कार्यक्रम करतात घोषणा देतात.माञ कुणी विटंबना केली तर आपण त्यावर आवाज उचलतो. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच नाव असलेला चौकातला बोर्ड झाकुन त्यावर विविध लोक स्वताच्या नावासाठी व्यापारासाठी जाहिरात बॅनरबाजी करुन महापुरुषाचा नावाचा अपमान करतात.हि खेदजनक घटना विकास नगर रिक्षा संघटनेच्या चौकात वारंवार घडत असल्याचे पाहण्यास मिळते.त्याचे वृत्त प्रजेचा विकास ने या आधी दिले होते. तसेच संपूर्ण प्रभाग क्रमांक २४ नव्याने झालेल्या व जुना प्रभाग क्रमांक १६ विकास नगर किवळे रावेत मामुर्डी या ठिकाणी अनेक दिशादर्शक हे व्यापारी जाहिरातदार व आजी माजी भावी नगरसेवकांच्या जाहिरातबाजी मुळे झाकले जातात त्यामुळे शहराचे प्रभागाचे विद्रुपीकरण पहावयास मिळते. यावर पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन आणि स्थानिक नेते आवाज उचलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.अनेक वेळा सांगुनही महापुरुषांचे नावे असलेले बोर्ड व शहरातील प्रभागातील दिशा दर्शक बोर्ड झाकले जातात.अनेक वेळा फक्त रिक्षा संघटनेचे रिक्षा चालक महाराजांच नाव झाकु नका या पेक्षा महाराजांची बदनामी दुसरी नाही असे सांगुनही वारंवार लोक महाराजांचा अपमान करतात.शेजारीच माजी नगरसेवक मनोज खानोलकर व शिवसेनेचे युवा नेते भावी नगरसेवक राजेंद्र तरस यांचे कार्यालय देखील आहे तरीही त्यांचं या घटनेकडे दुर्लक्ष होत आहे.माञ यावेळेस महेश पटेकर सामाजीक कार्यकर्ते यांनी दखल घेत बोर्ड काढण्यास सांगितला माञ अद्याप बोर्ड काढला गेला नाही, अनेक वेळा नागरिकांनी याबद्दल दुःख व्यक्त केले पण सांगूनही ऐकत नसल्याचे पाहवयास मिळते. महापालिका प्रशासन कारवाई का करत नाही अशा अशा फ्लेक्स लावणाऱ्यांना पालिका प्रशासनाकडून जरब बसणे खूप गरजेचे आहे.यामुळे मोठी दंगल ही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आपण सर्व सुज्ञ नागरिकांनी व जाहिरातबाजी करणाऱ्यांनी याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.बॅनर लावताना महापुरषांची नावे व दिशादर्शक बोर्ड झाकले जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.मात्र याकडे शिवजयंती करणारे शिवाजी महाराजांना आम्ही खूप मानतो व छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला गर्व आहे असे म्हणणारे याकडे बघून दुर्लक्ष करतात याचेच म्हणावे तेवढे वाईट वाटते अशा लोकांना ज्यांना महापुरुषांचा आदर नाही त्यांना जरब बसणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे

Previous articleस्मार्ट सिटीच्या जनरल मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर) पदी सहशहर अभियंता मनोज सेठिया यांची नियुक्ती
Next articleIMPACT- बातमी लागताच अर्बन गेटवेच्या मालक आणि चालक यांनी त्वरित बोर्ड काढला व दिलगरी केली व्यक्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 4 =