पिंपरी,दि.०३ मार्च २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- चौथास्तंभ संपादक पत्रकार व सोशल मीडिया संघ(रजि) पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षपदी पञकार अर्चना मेंगडे यांची निवड, निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष विकास कडलक,पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके तसेच शहर सचिव विकास चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी नामदेव ढाके व विकास कडलक यांनी नवनिर्वाचीत महिला शहरध्यक्ष अर्चना मेंगडे यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सर्तक पोलीस टाइम्स च्या पुणे जिल्हा उपसंपिदिका पदा वर कार्यरत आहेत.यावेळी अर्चना मेंगडे यांनी पत्रकार संघाच्या वाढीसाठी व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व पत्रकार संघाच्या नियमांचे काटेकोर पालन करून पत्रकार संघाचे काम करेन व आपल्या सर्वांचे सोबतीने पत्रकारांसाठी जे जे शक्य आहे ते ते करण्याचा सतत प्रयत्न करत राहील असे मत व्यक्त केले.
Home ताज्या बातम्या चौथा स्तंभ संपादक पत्रकार व सोशल मीडिया संघाच्या पि.चि. महिला शहरध्यपदी अर्चना...