विकासनगर-किवळ,दि.०३ मार्च २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- जागतिक महिला दिना निमित्त ०६ मार्च २०२२ रोजी सायं ०६.००वा. दिपक भाऊ मधुकर भोंडवे युवा मंच च्या वतीने आयोजित गप्पा-गोष्टी,गाणी,डान्स,रंजक खेळ त्यात लावणीची जोड खेळ रंगला पैठणीचा अर्थात न्यू होम मिनिस्टर प्रथमच येणार सरप्राईझ भाऊजी प्रभाग क्रमांक २४ च्या महिलांसाठी ऑर्केस्ट्रा म्युझिक ब्लास्टर निर्माता दिग्दर्शक विजय पानसरे सादर करते, आपल्या प्रभाग क्रमांक २४ मध्ये फक्त महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे.या कार्यक्रमांमध्ये आर्कर्षक बक्षीसे
प्रथम क्रमांक – टू व्हीलर व मानाची पैठणी,
द्वितीय क्रमांक – एलईडी टीव्ही व मानाची पैठणी,
तृतीय क्रमांक – फ्रिज व मानाची पैठणी,
चौथा क्रमांक –वॉशिंग मशीन व पैठणी
सर्वात महत्त्वाचं म्हणजे सात लकी ड्रॉ ज्यामध्ये सात महिलांना मिळणार मानाची पैठणी
कार्यक्रमाच्या ठिकाणी खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तेथेच प्रवेश फॉर्म भरून घेतला जाईल व त्याच प्रवेश फॉर्मच्या चिट्या मधुन ७ लकी ड्रॉ काले जातील.खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच कुलकर्णी हॉस्पिटल सोमर अनिल शेठ चव्हाण यांच्या आठवडी बाजारा जवळ विकास नगर किवळे याठिकाणी होणार आहे.दिपकभाऊ मधुकर भोंडवे यांनी सर्व महिला भगिनींना कार्यक्रमात सहभागी होण्याचे अवहान केले आहे.तसेच सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.