किवळे,दि.०१ मार्च २०२२ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-नगरसेवक मोरेश्वर भोंडवे व सचिन चाय पॉइंट यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्रीनिमित्त महाअभिषेक व डमरू आरती,खाकी वर्दीतील गायक बळीराम चव्हाण(महा.पोलिस) व गायक पंढरीनाथ महाराज सुतार यांचा भक्ति संगीतचा कार्यक्रम तसेच माई बाल भवन येथील अंध मुलींच्या संगीताचा व प्रार्थनाचा कार्यक्रम मुकाई चौक किवळे येथे करण्यात आला.महाप्रसाद- खिचडी, उपवासाचा शेव चिवडा, केळी राजगिरा लाडू,चहा व खिचडी,साबुदाणा चिवडा फराळ वाटप करण्यात आले.हजारो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला.महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण बर्फा पासून दोन शिवलिंग बनवले होते.त्या सोबत फोटो काढण्याचा मोह भाविकांना आणि येणार्या प्रत्येका मध्ये दिसुन येत होता.हा कार्यक्रम गेले सहा वर्षा पासुन सचिन साबळे त्यांच्या चाय पाॅईंट वर मुकाई चौक किवळे येथे करतात.नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, गणेश भोंडवे, बाळासाहेब गायकवाड, बापू कातळे, निलेश तरस,नवनाथ तरस,नवनाथ लोखंडे,प्रशांत येळवंडे,सचिन साबळे,संतोष म्हस्के,जेष्ठ नेते सुदाम तरस यांनी सर्वांना संबोधित केले. तर यावेळी शितल साबळे, रंजना वाघमारे, रेखा साबळे, रामदास साबळे, सुभाष कडेकर, कमलाकर दांगट ,मोरेश्वर तरस, सचिन बापू तरस,बाळासाहेब झंझाड,दत्ता गायकवाड,विनोद भंडारी,सचिन शिंगाडे,गणेश सलगर,सुरज वाघमारे,ओमकार वाघमारे,अभिषेक आवारे,योगा वाल्मिकी,अतुल घोडगे, विनोद लोंढे,दत्ता जगताप, विक्की सोनवणे, रोहित माने,कमलेश भोसले, संदीप साबळे, यश सुतार, धीरज तंतरपाळे, प्रणव गोरे, अनिकेत वाघमारे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Home ताज्या बातम्या नगरसेवक मोरेश्वर भोंडवे व सचिन चाय पॉइंट यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्रीनिमित्त महाअभिषेक...