खडकी,दि.०४ मार्च २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- उपनियंत्रक ना.सं. पुणे यांच्या अंतर्गत नविन नोंदणी केलेल्या स्वंयसेवकांकरिता दि. २१/०२/२०२२ ते २५/०२/२०२२ या कालावधीत ना. सं. मुलभूत प्रशिक्षण वर्ग टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय, खडकी , पुणे येथे 11:०० ते 5:30 वाजे पर्यंत सुरु करण्यात आला आहे.
सदर प्रशिक्षणास एकूण ४३ स्वंयसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदरणीय संचालक ज्ञानेश्वर मुरकुटे सरांनी केले , उपप्राचार्य प्रा. तानाजी गायकवाड सर यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन देशसेवा करण्याचे अहवान केले. प्रशिक्षण नियोजनात मार्गदर्शन आदरणीय प्राचार्या डॉ. उर्मिला स डो लिकर यांनी केले . प्रशिक्षणास नियोजित वेळापत्रकाप्रमाणे व्याख्याने व प्रात्यक्षिकांचे श्री. आ. वि. शिंदे ( स. उ . नि ) व श्री. अ.मा . आवारे उपनियंत्रक यांनी सादरीकरण केले. आदरणीय लुगडे सरांनी विद्यार्थ्यांना मारगदर्शन केले. या प्रसंगी प्रा. दळवी व प्रा. घाडगे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शीतल रणधीर यांनी केले.