विकासनगर-किवळे,दि.12 डिसेंबर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- आधारवड लोकनेते मा.खा.शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात विविध उपक्रम राबवण्यात आले याच पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक 16 विकास नगर- किवळे दांगट वस्ती,(संगीता आपार्ट.सोमर) परिसरात राष्ट्रवादीचे युवा नेते संकल्प सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व भावी नगरसेवक वस बापु दिनकर कातळे यांच्या वतीने आदरणीय लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
उपमुख्यमंञी अजितदादा पवार,खासदार सुप्रिया ताई सुळे,युवा नेते पार्थदादा पवार,आमदार अण्णा बनसोडे,शहरध्यक्ष संजोग वाघेरे,मा.विरोधी पक्षनेते नगरसेवक नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली,महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या संकल्पनेतून केअर लाईफ लाईन हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले या शिबिरामध्ये ब्लड प्रेशर,शुगर तपासणी, फुल बॉडी चेकअप, ईसीजी, इत्यादी मोफत तपासण्या करण्यात आल्या या आरोग्य शिबिरात कोरोना प्रतिबंधक दोन्ही लस पूर्ण केलेल्या व्यक्तींना त्यांचे प्रमाणपत्राचे स्मार्ट कार्ड बनवून मोफत वाटप करण्यात आले या आरोग्य शिबिरात प्रभागातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत साडेतीनशे ते चारशे लोकांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिरात तपासणी करून घेतली या तपासणीत कोणीही गंभीर असा रुग्ण आढळून आला नाही.
यावेळी माजी नगरसेवक किसन दादा नेटके,माजी नगरसेवक मनोज खानोलकर,सामाजीक कार्यकर्ते रवीनाना चव्हाण, उपसरपंच दिनकरराव कातळे, अंकुश तरस,बाळासाहेब तरस, रामभाऊ दांगट, संजय कातळे,फुले शाहु आंबेडकर विचारमंच चे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे,रिपाई(आठवले) मावळ लोकसभेचे कार्यध्यक्ष दिलीप कडलक,राजेंद्र नेटके, भारत शिवणकर, शिवम दांगट प्रसाद तरस,पि.चि.राष्र्टवादी महिला उपाध्यक्ष पूजा मुर्गेश, ज्ञानेश्वर शेळके, संदीप तरस, बापु कुदळे,कलिम सय्यद आदी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच संकल्प सोशल फाउंडेशन चे पदाधिकारी कार्यकर्ते व बापू कातळे मित्रपरिवार उपस्थित होते.