पिंपरी,दि.14 डिसेंबर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा नवनिर्वाचित अध्यक्ष कोण होणार यावरून अंतर्गत रस्सीखेच चालू आहे. अनेक चर्चा ही रंगू लागल्यात मात्र राष्र्टवादी महिलांन समान संधी देते आणि महिलांचा आदर करणारा पक्ष आहे,पिंपरी चिंचवड शहराच्या धर्तीवर मंगला कदम,वैशाली घोडेकर,सुलक्षणा शिलवंत-धर या पैकी कोणाची शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात येईल का ? पिंपरी-चिंचवड शहराच्या धर्तीवर महिलांना फादर बाॅडीचे शहराध्यक्ष पद मिळणार का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या फादर बॉडीवर महिलांचे नेतृत्व माजी आमदार विलांस लांडे,अजित गव्हाणे तसेच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पदाधिकारी स्वीकारणार का? पिंपरी-चिंचवड शहरात मंगला कदम,वैशाली घोडेकर यांनी महापौर पदही भूषविले आहे यांच्या काळात कामकाजही चांगले होते,तसेच पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने झंजावात उभा करण्यात सुलक्षणा शिलवंत-धर याही आघाडीवर आहे. पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे तिकीट आणून त्यांनीही शहरावर आपली ताकद दाखवली आहे, मात्र त्यांचे तिकीट ऐनवेळी कापण्यात आल्याने पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांना देण्यात आले मात्र पिंपरी-चिंचवड शहरात सुलक्षणा शीलवंत धर यांनी त्यांची पकड कायम ठेवली आहे तसेच सध्या शहराध्यक्ष पदासाठी महिला नेतृत्व मध्ये शहरध्यक्ष पद जावे अशी चर्चा जोर धरत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात जर राष्ट्रवादीला जर सत्ता आणायची असेल तर अजितदादां पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगला कदम,सुलक्षणा धर(शिलवंत) किंवा वैशाली घोडेकर या शहराचे नेतृत्व उत्तम प्रकारे पार पाडू शकतात सध्या पिंपरी चिंचवड शहरात दोन्ही आमदारांच्या विरोधात बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी थोडे मागे पुढे पहातात.पिंपरी-चिंचवड शहरातील अंडी पिल्ले अजितदादांना माहित असले तरी शहरातील नागरिकांना काय हव आहे याकडे मात्र अजितदादां पवार यांचे दुर्लक्ष आहे असे दिसून येते कदम,घोडेकर आणि धर या भाजपचा दोन्ही आमदार विरोधात पक्षाची भूमिका उत्तम प्रकारे बजावु शकतात. त्या डॅशिंग असल्याने पिंपरी-चिंचवड शहरामध्ये फादर बाॅडी ताकतवर बनेल.अंतर्गत वाद ही संपुष्ठात येईल,राष्र्टवादी पक्षातील नेते पदाधिकारी संभ्रम अवस्थेत आहेत नक्की कोणा मागे थांबायच त्यामुळे ऐन वेळेला शहरध्यक्ष बदलणे म्हणजे सभ्रंम निर्माण करणे होय.त्यामुळे शहरात अनेक चर्चाना उधान आले आहे.कोणी भेटीचे फोटो तर कोणी विमानात चर्चा झाली तर कोणी अंगावर का घेयच अशा अनेक चर्चा वार्या सारख्या पसरत आहेत,सुञा कडुन मिळालेल्या माहिती नुसार शहरध्यक्ष पदा मुळे शहरात पदाधिकारी जबाबदारीने पुढे येत सत्ताधारी पक्षाला विरोध करताना दिसत नाहीत.काॅंग्रेस पक्षाने जेवढे अंदोलन घेतली त्यांच्या निम्मेपण अंदोलन राष्र्टवादी पक्षाने घेतली नाहीत,कार्यकर्त्यानांही अजुन असे वाटत आहे की पिंपरी चिंचवड शहरात सत्ता राष्र्टवादी ची आहे,त्यामुळे नागरिक मतदारांमध्ये पिंपरी चिंचवड मध्ये मिलीजुली सरकार असल्याच वारवार बोले जात आहे.भाऊ दादा च्या संपर्कात राष्र्टवादी चा बडा नेता नामांकित नगरसेवक आहे.कधीही भाजपात प्रवेश करेल अशी चर्चा देखील चिंचवड व भोसरी मतदार संघात होत आहे.त्यामुळे शहराला खंबीर नेतृत्व मिळणार का? या कडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.