Home ताज्या बातम्या उच्चशिक्षित उत्तम केंदळे कामाच्या विचाराने झपाटलेला नगरसेवक- आमदार महेश लांडगे

उच्चशिक्षित उत्तम केंदळे कामाच्या विचाराने झपाटलेला नगरसेवक- आमदार महेश लांडगे

0

पिंपरी,दि.१४ नोव्हेंबर २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-प्रा. उत्तम केंदळे यांनी नगरसेवक ते क्रीडा समिती सभापती असे लक्षवेधी कार्य केले आहे. प्रभागातील नागरिकांना ते सातत्याने मदत करत असतात. प्रा. केंदळे हे कामाच्या विचाराने झपाटलेला नगरसेवक आहेत, अशा शब्दांत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी कौतूक केले.

क्रीडा सभापती प्रा. उत्तम केंदळे यांच्या पुढाकाराने आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त यमुनानगर येथील ठाकरे मैदानावर भव्य बालजत्रेचे आयोजन केले होते. प्रा उत्तम केंदळे स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने यासाठी पुढाकार घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद् घाटनप्रसंगी आमदार लांडगे बोलत होते.

या कार्यक्रमांस भाजपाचे पदाधिकारी दिपक कुलकर्णी, अनिल वाणी, रमाकांत पाटील, चंद्रकांत शेडगे, लक्ष्मण शेळके, धनाजी मोरे, रवींद्र कुकडे, नारायण पाटील, प्रशांत बाराथे , सोमनाथ काळभोर शेखर आसरकर, गिरीष देशमुख, आदित्य कुलकर्णी ज्येष्ठ नागरिक संघाचे गजानन ढमाले, प्रमोद येवलेकर, विनिता श्रीखंडे, बाबासाहेब उत्तेकर, शिवाजी शेळके, सारडा काका, मनोहर चौगुले, सामाजिक कार्यकर्त्या डिगा उदयकुमार, क्रांतीवीर मित्र मंडळाचे श्रीकांत सुतार, लक्ष्मी विर्डिकर, विमल काळभोर, सारिका चव्हाण, जयश्री देशमाने, सुप्रिया परब, सुप्रिया केंदळे, शुभांगी काळवीट , शीला देशपांडे, नीलिमा गोलार, जयश्री केंदळे, धनश्री घोडके, मुक्ता गोसावी आदी उपस्थित होते.
आमदार लांडगे यावेळी म्हणाले की, क्रीडा सभापती म्हणून प्रा. केंदळे यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. खेळाडूनां कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम वर घेणे व त्याला पालिकेच्यावतीने राज्य व देश पातळीवर खेळवणे यामुळे शहराचे नावलौकिक होणार आहे. माझी राजकीय वाटचाल आपल्यासमोर आहे. आपण माझ्यासोबत आहात त्यामुळे मला कसलीही भीती नाही. २०१४ नंतर काम करतो त्याच्या मागेच नागरिक जातात. नागरिक कामाला, विकासाला प्राधान्य देतील असे बोलून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत या प्रभाग क्रमांक १३ मधून केंदळे हेच नगरसेवक असतील असा सूचक इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
प्रा. उत्तम केंदळे म्हणाले की, कोरोनामुळे घरात असल्यामुळे मोबाईल मध्ये गुंतलेल्या छोट्या मुलांना खेळण्याची संधी मिळावी या हेतूने आमदार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बालजत्रेचे आयोजन करण्यात आले.भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभागात विकासाला महत्त्व दिले जात आहे.आतापर्यंत भक्ती शक्ती उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावला आहे.स्मशानभूमीसाठी ही १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गोरगरिबांसाठी यमुनानगर रुग्णालय अजून सुसज्ज करण्यात येणार आहे. प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणीसाठी वेळ देऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. क्रीडा सभापतिपदी दुसऱ्यांदा संधी दिल्याबद्दल केंदळे यांनी आमदार महेशदादा लांडगे यांचे आभार मानले व केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Previous articleगंभीर अजार असताना महिलेची केली फसवणुक,दोघान विरोधात गुन्हा दाखल
Next articleमुलीला सासरचा जाच,वडीलांनी केली आत्महत्या ते पाहुन मुलीने सोडले प्राण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 2 =