Home ताज्या बातम्या मुलीला सासरचा जाच,वडीलांनी केली आत्महत्या ते पाहुन मुलीने सोडले प्राण

मुलीला सासरचा जाच,वडीलांनी केली आत्महत्या ते पाहुन मुलीने सोडले प्राण

20
0

देगलुर-शहापुर,दि.१७ नोव्हेंबर २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- गाडी आणि फ्लॅट घेण्यासाठी सासर कडून मुलीचा होत होता छळ ते पाहून मुलीच्या वडिलांनी गळफास लावून केली आत्महत्या हि घटना नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शहापूर इथे घडली आहे. वडीलांनी आपल्यामुळे आत्महत्या केली, हे दुखः सहन न झाल्याने मुलीनंही जाग्यावर प्राण सोडले . दुखद असी हृदय पिळवटून टाकणारी हि घटना आहे, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.देगलूर तालुक्यातील सुगाव येथील माधुरी शंकर भोसले हिचा विवाह आठ महिन्यापुर्वी मुखेड तालुक्यातील उंद्री येथील संदीप वडजे सोबत झाला होता. संदीप पुणे येथे कंपनीत नोकरी करत होता. लग्नानंतर पती संदीप आणि सासरच्या मंडळींनी गाडी आणि फ्लॅट घेण्यासाठी पाच लाखाची मागणी माधुरी कडे करत तिचा शारिरीक आणि मानसिक छळ करत होते.
माधुरीने ही घटना वडील शंकर भोसले यांना सांगितली. शंकर भोसले यांनी अगोदरच मुलीच लग्न कर्ज काढून केलं ते कर्ज फिटलं नाही आता पाच लाख कुठून आणू म्हणून चिंतेत होते. काल (ता.१३) रात्री मुलीच्या सासरकडची मागणी पूर्ण करु शकत नाही म्हणून शंकर यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वडीलांनी आपल्यामुळे आत्महत्या केल्याचं दुखः माहेरी असलेल्या माधुरीला सहन झाले नाही आणि तिने वडीलांच्या मृतदेह पहातच शेजारीच प्राण सोडले.मृत शंकर भोसले यांच्या पत्नी नं दिलेल्या तक्रारी वरुन पती संदीप वडजेसह माधुरीच्या सासरच्या पाच जणांना विरोधात देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पाच लाख दिले नाही तर पोटच्या मुलीचं आयुष्य उध्वस्त होईल या भीतीने मृत्यू ला कवटाळणाऱ्या बापासोबत मुलीनंही प्राण सोडल्याची ही दुर्दैवी घटना देगलुर तालुक्या काळीमा फासणारी आहे.या घटनेस जबाबदार असणाऱ्या माधुरीचा पती आणि सासरच्या मंडळींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी चर्चा संपुर्ण देगलुर तालुक्यात जोर धरत आहे या कडे देगलुरचे नवनिर्वाचीत आमदार व नांदेड जिल्हाचे पालकमंञी लक्ष देतील का व अशा प्रकार करणार्‍यांना जरब बसवण्यासाठी नांदेड जिल्हात काय निर्णय घेतील का? या कडे सर्वाचे लक्ष लागुन आहेत.

Previous articleउच्चशिक्षित उत्तम केंदळे कामाच्या विचाराने झपाटलेला नगरसेवक- आमदार महेश लांडगे
Next articleप्राधिकरणवासीयांना आमदार महेश लांडगे यांचे “दिवाळी गिफ्ट’; सदनिका हस्तांतरण शुल्क आकारणी रद्द करण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five + sixteen =