Home ताज्या बातम्या गंभीर अजार असताना महिलेची केली फसवणुक,दोघान विरोधात गुन्हा दाखल

गंभीर अजार असताना महिलेची केली फसवणुक,दोघान विरोधात गुन्हा दाखल

0

पिंपरी,दि.9 नोव्हेंबर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- HIV एडस सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या आरोपीने महिलेला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करुन व त्याच महिलेकडून वेळोवेळी पैशाची मागणी करून तसेच लग्नाबाबत विचारले असता तिला मारहाण व शिवीगाळ करून दिशाभूल करून आरोपी संतोष शंकर गोरे (वय 51 वर्ष) राहणार आळंदी पुणे त्याला HIV एडस सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असताना त्याने त्या महिले पासून लपवून ठेवले, कोणत्याही सुरक्षेच्या साधनाशिवाय तिच्याशी शरीर संबंध ठेवून त्या महिलेच्या जिवास धोका निर्माण होईल असे कृत्य करून त्या महिलेची फसवणूक केली व तसेच आरोपी संतोष शंकर गोरे यांचा मित्र अनिल दिनकर शिंदे (वय-62 वर्ष) राहणार नारायणगाव पुणे याने सदर महिलेला कुठेही तक्रार केली तर तिला व तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हा प्रकार सप्टेंबर 2020 ते 26 ऑक्टोबर 2021 च्या दरम्यान पाचवा मजला संतोषी माता चौक नेहरूनगर पिंपरी पुणे व कुलकर्णी सदान रूम नंबर 301 ज्योती इंग्लिश स्कूल समोर पिंपरी पुणे 18 व देहूरोड, गोवा,तिरुपती बालाजी या ठिकाणी सदर प्रकार वारंवार घडला आहे महिलेला फसवणूक लक्षात येताच त्या महिलेने 8 नोव्हेंबर 2021 रोजी तक्रार दाखल केली त्यानुसार आरोपीविरोधात पिंपरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 733/2021 भा. द. वि कलम 269,270,417,420,504,506, 34 गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती रुपाली बोबडे यांच्याकडे असून पुढील अधिक तपास पिंपरी पोलिस करत आहेत.

 

Previous articleलोकाभिमुख प्रशासक…. आयुक्त राजेश पाटील
Next articleउच्चशिक्षित उत्तम केंदळे कामाच्या विचाराने झपाटलेला नगरसेवक- आमदार महेश लांडगे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 3 =