Home ताज्या बातम्या खंडेलवाल दोन्हि सख्खे भाऊ झाले पक्के वैरी,एकमेंकान विरोधात गुन्हा दाखल

खंडेलवाल दोन्हि सख्खे भाऊ झाले पक्के वैरी,एकमेंकान विरोधात गुन्हा दाखल

119
0

देहुरोड विकासनगर,दि.25 ऑक्टोबर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- देहुरोड विकास नगर किवळे परिसरात खंडेलवाल कुटुंबात दोन भावांमध्ये वर्चस्व आणि कॉम्पिटिशन ची लढाई इतकी वाढली की दोघांनी एकमेकांच्या विरोधात पक्के वैरपण घेतले. रविवार दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 12.00वा दरम्यान ह्या दोन्ही भावामध्ये जिन्याचा दरवाजा उघडणे यावरून वाद झाला या वादांमध्ये दोघांनी एकमेकांना जीवे मारण्याची भाषा करत एकमेकांच्या डोक्यात लाकडी दांड्याने फावड्याच्या दांडक्याने हाणून मारून घेतले तेवढ्यावरच न थांबता दोघांची भांडणे इतकी शिगेला पोचली की दोघांनीही देहूरोड पोलीस स्टेशन गाठले पोलिसांनीही दोघांचे म्हणणे ऐकत दोघांनी केलेल्या घटनेच्या आढावा घेत दोघांच्याही विरोधात गुन्हा दाखल केला मात्र दोघांनाही अद्याप अटक झालेली नाही अंकुश खंडेलवाल आणि नीरज खंडेलवाल ह्या दोन्ही भावांमध्ये समंजसपणा नसल्याने आज दोघेही भाऊ एकमेंका समोर आरोपी म्हणून उभे झाले आहेत दोघांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केल्याने संपूर्ण देहूरोड विकास नगर किवळे विभागात हा चर्चेचा विषय बनला आहे.

दुकानातून बाहेर निघ नाहीतर तुला सोडणार नाही, तुला जीवे मारून टाकीन

अंकुश सुभाषचंद्र खंडेलवाल याचा भाऊ निरज सुभाषचंद्र खंडेलवाल(वय-38) यांने दुकानात जाण्याकरता असलेला जिन्याच्या दरवाजाला आतून कुलूप लावल्याने अंकुश खंडेलवाल(वय-39) यांने त्याला दरवाजा आतून उघडण्यास सांगितले व मला माझ्या दुकानात जायचं आहे असे विनंती करून दरवाजा उघडण्यासाठी त्याने दुकानात गेला असता आरोपी नीरज खंडेलवाल(वय-38)याने तू दुकानात कसा आला तुझी हिम्मत कशी झाली दुकानातून बाहेर निघ नाहीतर तुला सोडणार नाही, तुला जीवे मारून टाकीन असे म्हणून द्वेष भावनेने नियोजनबद्ध पद्धतीने जीवे मारण्यासाठी अंकुश खंडेलवाल याला खाली ढकलून देऊन लाकडी दांडक्याने व तसेच स्टील प्लेटींग लपेटलेल्या फावड्याच्या दांडक्याने मारले त्यात अंकुश खंडेलवाल याच्या उजव्या हातास खांद्यावर डोक्यावर मार लागला आहे. तसेच अंकुश खंडेलवाल यांने जिन्याजवळ लावलेल्या सीसी टीव्ही हि आरोपी नीरज ने तोडला व त्याचे नुकसान केले. त्यामुळे अंकुश खंडेलवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देहूरोड पोलीस स्टेशन या ठिकाणी 586/ 2021 भादवि कलम 308,324,323,506, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

कॉम्पिटिशन मुळे वाद, जिन्याचा दरवाजा आतून का लाॅक केला

नीरज सुभाष चंद्र खंडेलवाल याचा मोठा भाऊ आरोपी अंकुश सुभाषचंद्र खंडेलवाल याने कॉम्पिटिशन मुळे वाद करून तू जिन्याचा दरवाजा आतून का लाॅक केला म्हणून निरज च्या दुकानाच्या दारवजा वर जोरात लाथा मारून व निरजला खाली पाडून दुकानातील खुर्ची हातात घेऊन निरज च्या डोक्यात व हातावर हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे व गळ्यावर हाताच्या नकाने ओरखडून जखमा केल्या म्हणून नीरज खंडेलवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देहूरोड पोलीस स्टेशन या ठिकाणी घराचे अतिक्रमण गुन्हा रजिस्टर नंबर 587/ 2021 भादवि कलम 452, 324,323 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

दोन्ही भाऊ आरोपी अटक नाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे हे दोघांचे ही तपास अधिकारी असून देहूरोड पोलीस पुढील तपास करीत आहेत

Previous articleदिपक मधुकर भोंडवे यांच्या माध्यमातुन पिंपरी चिंचवड मनपा च्या सहकार्याने लसीकरण मोहीम
Next articleपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढणार 128 वरून 139 होणार ; राज्य मंञिमंडाळात निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 − 4 =