Home ताज्या बातम्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढणार 128 वरून 139 होणार ; राज्य मंञिमंडाळात...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढणार 128 वरून 139 होणार ; राज्य मंञिमंडाळात निर्णय

0

पिंपरी,दि.27 ऑक्टोबर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- आज मंञिमंडळात घेतलेल्या निर्णयानुसार 12 ते 24 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या महापालिकांमधील नगरसेवकांची संख्या 11 ने वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण नगरसेवकांची संख्या आता 128 वरून 139 होणार आहे. परिणामी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार आता प्रभागांची संख्याही वाढणार आहे.गेल्या दहा वर्षांत राज्यातील मोठ्या शहरांमध्ये व लहान नागरी क्षेत्रांमध्ये झालेले रचनात्मक बदल,झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी समस्या त्यामुळे विकास योजनांचा वेग वाढवण्याच्यादृष्टीने नगरसेवकांची संख्या वाढवणे आवश्यक असल्याने मंञीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्य सरकारने महापालिका व नगरपरिषदांच्या नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या घरात गेल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांची संख्याही 11 वाढणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत नगरसेवकांची संख्या ही 128 ऐवजी ती 11 वाढून 139 होणार आहे.पिंपरी-चिंचवड मधील 2011 च्या जणगणनेनुसार लोकसंख्या 17 लाख 27 हजार 692 इतकी आहे.40 हजार लोकसंख्येमागे एक प्रभाग गृहित धरुन त्यानुसार त्रिसदस्यीय प्रभाग रचनेस प्रारंभ झाला व 128 नगरसेवकांसाठी 43 प्रभाग निश्चित करण्यात आले होते.व प्रभाग आराखडा प्रसिद्ध करण्याचा बेत होता माञ आता मंञी मंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णया नुसार वाढत्या लोकसंख्ये प्रमाणे आता 35 हजार लोकसंख्येमागे एक प्रभाग याप्रमाणे प्रभाग रचना होणार,नगरसेवकांची संख्या ही 128 ऐवजी ती 11 वाढून 139 असणार.तर शेवटचा प्रभाग हा चार सदस्यांचा होईल तर प्रभाग 46 होतील.प्रभाग आराखडा रचनेत काहीसा बद्दल करण्यात येईल व प्रभाग क्षेञ कमी करताना माञ अधिकार्‍यांची दमछाक होईल.राजकीय पुढारी चिंतेत आलेत आता कसा आणि कुठुन प्रभाग रचना होईल.

महानगरपालिका, नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान 65 सदस्य व कमाल 175 इतकी आहे. तर नगरपरिषदांमधील सदस्य संख्या किमान 17 सदस्य व कमाल 65 इतकी आहे. महानगरांमधील व लहान नागरी क्षेत्रांमध्ये झालेले रचनात्मक परिवर्तन व नागरी समस्यांची उकल व विकास योजनांचा वेग वाढविणे यासाठी सर्व कार्यक्षेत्राला योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने सदस्य संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.
2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर महानगरपालिका व नगरपरिषदांमधील सदस्य संख्या निर्धारित आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे 2021 च्या जनगणनेचे निष्कर्ष अप्राप्त आहेत. त्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. या कालावधीत  लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहित धरुन अधिनियमात नमुद केलेल्या महानगरपालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत 17 टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. किमान सदस्य संख्या वाढविल्यामुळे पुढील सदस्य संख्या देखील वाढेल व त्यामुळे पर्याप्त सदस्य संख्या निश्चित होईल.
महानगरपालिकांमध्ये 3 लाखापेक्षा अधिक व 6 लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 76 व अधिकतम संख्या 96 पेक्षा अधिक नसेल.
6 लाखापेक्षा अधिक व 12 लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 96 व अधिकत्तम संख्या 126 पेक्षा अधिक नसेल.
12 लाखापेक्षा अधिक व 14 लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 126 व अधिकत्तम संख्या 156 पेक्षा अधिक नसेल.
24 लाखापेक्षा अधिक व 30 लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 156 व अधिकत्तम संख्या 168 पेक्षा अधिक नसेल.
30 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 168 व अधिकत्तम संख्या 185 पेक्षा अधिक नसेल.
अ वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या 40 व अधिक संख्या 75 हून अधिक नसेल.
ब वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या 25 व अधिक संख्या 37 हून अधिक नसेल.
क वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या 20 व अधिक संख्या 25 हून अधिक नसेल.

Previous articleखंडेलवाल दोन्हि सख्खे भाऊ झाले पक्के वैरी,एकमेंकान विरोधात गुन्हा दाखल
Next articleचंद्रकांत पाटलांनी स्वत:च्या नेतृत्त्वाचं आत्मपरिक्षण करावं – संजोग वाघेरे पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 − six =