Home ताज्या बातम्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या

0

नवी दिल्ली,दि.10 सप्टेबंर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

”आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप  शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया !

राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद यांनी नागरिकांना गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या  आहेत.

राष्ट्रपतींनी एका संदेशात म्हटले आहे, “गणेश चतुर्थीच्या शुभ प्रसंगी मी  भारत आणि परदेशात राहणाऱ्या माझ्या  सर्व देशवासियांना  मनःपूर्वक शुभेच्छा आणि शुभकामना.देतो.

ज्ञान, समृद्धी, सौभाग्याचे प्रतीक असलेल्या श्रीगणेशाच्या जन्मोत्सवाचा  हा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.गणेश चतुर्थीच्या निमित्ताने, यंदा  आपण कोविड -19 महामारी विरुद्धचे आपले  प्रयत्न यशस्वी करण्यासाठी आणि आपल्या सर्वांना आनंद आणि शांतता  प्रदान करण्यासाठी श्रीगणेशाला  प्रार्थना करूया.

कोविड प्रतिबंधक योग्य वर्तनाचे पालन करत हा सण उत्साह आणि सौहार्दपूर्ण  वातावरणात साजरा करूया. ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two + 19 =