Home ताज्या बातम्या देहुरोड येथील सराईत गुन्हेगार अरमान बशीर शेख टोळीवर मोका

देहुरोड येथील सराईत गुन्हेगार अरमान बशीर शेख टोळीवर मोका

95
0

देहुरोड,दि.०४ ऑगस्ट २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- खुनाचा प्रयत्न, दुखापत,गंभीर दुखापत, चोरी, जबरी चोरी, दुखापत करुन जबरी चोरी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, खंडणी,जाळपोळ, पळवून नेणे, गर्दी-मारामारी_असे एकुण २८ गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड शहर या ठिकाणी दाखल आहेत. तसेच वरील सर्व आरोपी वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघाटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने देहूरोड पोलीस ठाणे हद्दितील सराईत गुन्हेगार आरबाज बशीर शेख टोळीवर मौका अंतर्गत कारवाई करण्यात आली

देहूरोड पोलीस ठाणे हद्दितील सराईत गुन्हेगार आरबाज बशीर शेख टोळीवर मौका ( महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियत सन १९९९ ) अंतर्गत कारवाई करण्यात आली.विलास सोंडे- वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देहुरोड पोलीस ठाणे, यांनी आनंद भोईटे, पोलीस उप आयुक्त,परिमंडळ-२ यांचे मार्फत देहुरोड पोलीस ठाणे, गु.र.नं. २६२/२०२१ भा.द.वि. कलम ३०७, ३२४, ५०४,५०६(२). १८८. २६९, २७०, १४३, १४४, १४७, १४८, १४९, आर्ग अँक्ट ४(२७), महा.पो.का. ३७(१)(३) सह १३५, क्रि.लॉ.अ.ओ. कलम ७, साथीचा रोग अधि. कलम ३ महाराष्ट्र कोव्हीड १९ च्या उपाययोजना २०२० चे कलम ११ चे तपासामध्ये आरोपी टोळी प्रमुख आरबाज बशीर शेख, वय-२३ वर्षे, रा. गहुंजे, मावळ, पुणे. याने (२) सलमान बशीर शेख, वय-२२ वर्षे, रा. गहुंजे, मावळ, पुणे. (३) संतोष उर्फ सोन्या चंद्रकांत धरणे, यय-३२ वर्षे, पा. एलीमेंट बिल्डींगचे बाजुला, थाॅमस कॉलनी, मामुर्डी, पुणे. (४) जे.डी. आरबाज उस्मान खान, वय १९ वर्षे, रा. जामा मस्जिद जवळ, देहूरोड, पुणे. (५) नियात जमीर शेख, वय-२३ वर्षे, रा. सी/ओ सातपते थॉमस कॉलनी, मामुर्डी, पुणे. (६) प्रिन्स उर्फ सोनु जॉन्स माखवाणी, वय-२५ वर्षे, रा. थॉमस कॉलनी,मामुर्डी, पुणे. (७) हुसेन हमीद सय्यद, वय-२१ वर्षे, रा.थाॅमस काॅलनी,मामुर्डी, पुणे. (८) मौला ऊर्फ लादेन ऊर्फ कादीर कलीम खान, वय-१९ वर्षे, रा. साईनगर, गहुंजे ता. मावळ, जि. पुणे. (९) अभिजीत हिरामण बोडके. रा. गहुंजे, मावळ, पुणे. (१०) संजय चोपडे, रा. गहुंजे, मावळ, पुणे, (११) समीर जमील शेख, रा.गहुंजे, मावळ, पुणे. (१२) पार्थीवन क्रिश्न विरण, रा, गहुंजे, मावळ, पुणे, यांच्या विरूद्ध खुनाचा प्रयत्न, दुखापत,गंभीर दुखापत, चोरी, जबरी चोरी, दुखापत करुन जबरी चोरी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, खंडणी,जाळपोळ, पळवून नेणे, गर्दी-मारामारी_असे एकुण २८ गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड शहर या ठिकाणी दाखल आहेत. तसेच वरील सर्व आरोपी वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघाटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियत सन १९९९ अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त सो. पिंपरी चिंचवड यांचेकडे पाठविला होता. सुधीर हिरेमठ, पोलीस उप-आयुक्त(गुन्हे) व डॉ. प्रशांत अमृतकर, साहय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१. पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा,पिंपरी चिंचवड यांनी सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करून ञुटींची पूर्तता करून सदरचा प्रस्ताव आदेश पारीत करण्यासाठी अपर पोलीस आयुक्त साो. पिंपरी चिंचवड यांचेकडे पाठविला होता दिनांक ०३/०८/२०२१ रोजी रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी निमंत्रण अपिनियन सन १९९९ चे कलम ३(१)(२),३(४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश पारीत केले.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त, कृष्ण प्रकाश सो, अपर पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे साो. सुमीर हिरेमठ पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), आनंद भोईटे पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२. डॉ. प्रशांत अमृतकर सहायक पोलीस आयुक्त. गुन्हे-१, यांच्या मार्गदर्शनाखाली. राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी.सी.बी. गुन्हे शाखा, विलास सोंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देहुरोड पोलीस ठाणे तसेच अंमलदार पोलीस हवालदार सचिन चव्हाण,पी.सी.बी. गुन्हे शाखा. व पो ना. अनिल जगताप, पोलीस ठाणे, यांचे पथकान केली आहे.

Previous articleLIVE ::पिंपरी चिंचवड महानगरपालिका अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व-2021(दिवस-3 रा)
Next articleLIVE :: पिंपरी चिंचवड महानगरपालिका अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व-2021(दिवस-४ था)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × two =