Home ताज्या बातम्या शिवसेनेला बेताल बोलण्याची सवय तर अजितदांदाना आत्मपरिक्षणाची गरज-आमदार आशिष शेलार

शिवसेनेला बेताल बोलण्याची सवय तर अजितदांदाना आत्मपरिक्षणाची गरज-आमदार आशिष शेलार

0

पिंपरी,दि. 22 जुलै 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात पिंपरी चिंचवड काही ठिकाणी गुन्हेगारांनी दादांना शुभेच्छाचांच वर्षाव करत मोठ्या प्रमाणांत फ्लेक्स बाजी केली गेली त्यावर अशिष शेलार यांनी पिंपरी येथे पञकार परिषदेत खडेबोल करत टिका केली आहे, अजित दादांना आत्मपरिक्षणांची गरज आहे.अजितदादा गुन्हेगारांना ह्या मोठ्या गुंडाना राज आश्रय तर देत नाहीना.शिवसेनेला बेताल बोलण्याची सवय लागत चालली आहे आणि शिवसेनेचे ब्लॅकमेलिंगचे धंदे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आता चालणार नाहीत.

गुन्हेगारांना जवळीक दिली तर ते बडया नेत्यांशी किती जवळीकता आहे.व जवळचे संबध आहेत यासाठी असे प्रकार करतात.तर काही दिवसा पुर्वी पिंपरी चिंचवड चे दोन्हि आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्यावर शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी टिका केली होती त्यास अशिष शेलार यांनी प्रतिउत्तर दिले.पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची भाजपची सत्ता जर सुज आहे तर शिवसेनेचे नऊ नगरसेवक काय बुज आहे का? शिवसेनेचा महापौर करणे म्हणजे बनियन बदलण्या इतके सोपे आहे का? शिवसेनेचा बेडुक किती फुगला तरी बैल होत नाही.दोन्ही आमदार ठेकेदारीत बुडालेत तर शिवसेना काय करत आहे स्मार्ट सिटी च्या ठेकेदारांना ब्लॅकमेल करत आहे.आता शिवसेनेची पिंपरी चिंचवड मध्ये ब्लॅकमेलींग चालणार नाही,आणि भाजप ती खपवुन घेणार नाही असे अवाहन देखील शेलार यांनी केले.नवी मंबई विमान तळा बाबत भाजप बाळासाहेब ठाकरेच्यां नावाचा आपमान कदापि करणार नाही,माञ शिवसेना स्वता हाताने अपमान करुन घेत असेल तर त्याला शिवसेना जबाबदार आहे.भाजपा तेथील स्थानिक जनते सोबत आहे,नवी मंबई येथील त्यांचा समाजाची व स्थानिकांची मागणी दि.बा पाटील यांचे नाव देण्याची आहे,दि.बा पाटील यांचे खुप योगदान आहे,आणि नवी मंबई विमान तळाला दि.बा पाटील यांचे नाव दिले गेले पाहिजे अशी ठोस भुमिका भाजपा ची आहे आणि राहील असे मत शेलार यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे एका रात्रीत पीएमआरडीए मध्ये विलीनीकरण म्हणजे ‘भूखंडाचे श्रीखंड पार्ट टू’ ची मुहूर्तमेढ आहे. राज्यात सर्वसामान्य जनतेला भेडसावणा-या समस्या सोडविण्याऐवजी महाविकास आघाडीच्या सरकार मधिल घटक पक्ष स्वबळाची भाषा करण्यात मश्गुल आहेत. एक स्वबळाची भाषा करतो, दुसरा अग्रलेख लिहीतो, तीसरा दिल्लीत जातो. जनतेच्या प्रश्नांची यांना काळजी नाही. रोज उठायचे नि सरकार पाच वर्षे टिकणार याचा मंत्र जप करायचा. यामुळे ‘जनता कोमात, तर स्वबळाची छमछम जोमात’ अशी टिकाही आमदार शेलार यांनी केली.

पिंपरी चिंचवड शहर भाजपाच्या वतीने बुधवारी (दि. 21 जुलै) पिंपरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, महापौर माई ढोरे, माजी खासदार अमर साबळे, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपा दक्षिण भारत आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, बाबू नायर, ॲड. मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे आदी उपस्थित होते.तर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे अनुपस्थित होते त्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा रंगली आमदार लक्ष्मण जगताप हे पक्षातंर्गत नाराज आहेत की काय?
महाविकास आघाडीवर टिका करताना शेलार म्हणाले की, राज्यातील शेतक-यांना बोगस बियाने दिली. कर्ज मुक्ती, पीकविमा, वादळामुळे झालेले नुकसान भरपाई, महिला अत्याचार, सायबर क्राईम याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरकार पोलिसांकडून वसूलीचे काम करत आहे. बारा बलूतेदार, अलुतेदार यांना मदत दिली नाही. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण टिकविता आले नाही अशा निष्क्रिय सरकारचा बुरखा फाडणार आहोत,राज्याच्या गृह मंञी देशमुख यांच्यावर जशी कारवाई झाली तशीच इतरांन वर ही व्हायला पाहिजे,तपास यंञणेवर विश्वास आहे आज ना उद्या योग्य ती कारवाही होईल असे स्पष्ट मत व्यक्त केल.


कॉंग्रेसवर टिका करताना शेलार म्हणाले की, कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी ऑक्सिजन प्लॅंन्टमध्ये भ्रष्टाचार झाला आहे का हे पहिले स्पष्ट करावे. यावर नाना पटोले त्यांचा राजीनामा घेणार का ? राजीव गांधींचे नाव घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार देऊ म्हणायचे आणि मंत्रालयातून जीआर काढून अधिकार काढून घ्यायचे, असे काम सरकार करीत आहे. पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे पन्नास हजार कोटींचे भूखंड एका रात्रीत पीएमआरडीएकडे वर्ग करणे म्हणजे शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आगामी भ्रष्टाचाराची मुहूर्तमेढ आहे. शिवसेनेच्या लोकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.त्यामुळे शिवसेनेला बेताल बोलण्याची सवय लागत चालली आहे आणि शिवसेनेचे ब्लॅकमेलिंगचे धंदे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आता चालणार नाहीत. ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कायद्याने जे करायला होते ते केले नाही. इंपिरीकल डाटा ठाकरे सरकारने का दिला नाही. मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यासाठी पंधरा महिने उशीर का झाला ? जर वेळेत आयोग स्थापन केला असता तर न्यायालयाने आरक्षण स्थगित केले नसते. मराठा आरक्षणाबाबत नविन सरकारने बाजू नीट मांडली नाही. त्यामुळे न्यायालयात आरक्षण टिकले नाही. जाती – जातींमध्ये भांडणे लावण्याचा तर मानस नाही ना ? असाही प्रश्न माजी मंत्री व भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी यावेळी उपस्थित केला.

Previous articleइलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleबचाव व मदतकार्याला गती देण्यासाठी स्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याचे,जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधींना सूचना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 2 =