Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत शहरातील वाहन पे-पार्किंग धोरणाच्या पहिल्या टप्प्यातील अंमलबजावणी झाली

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत शहरातील वाहन पे-पार्किंग धोरणाच्या पहिल्या टप्प्यातील अंमलबजावणी झाली

67
0

पिंपरी, दि. २जुलै २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत शहरातील वाहन पार्किंग धोरणाच्या पहिल्या टप्प्यातील अंमलबजावणीला आजपासून प्रारंभ झाला.  पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे ८० जागांचा समावेश आहे.

महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते या अंमलबजावणीचा शुभारंभ करण्यात आला.  पिंपरी येथील सिट्रस हॉटेल समोरील जागेत सशुल्क वाहनतळ करण्यात आले आहे.  या ठिकाणी कार्यक्रमाचे औपचारीक आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आयुक्त राजेश पाटील, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, बापु गायकवाड आदी उपस्थित होते.  वाहनतळाच्या ठिकाणी महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी शुल्क भरुन आपले वाहन पार्क करुन वाहन पार्कींग धोरणाचा शुभारंभ केला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत पिंपरी चिंचवड शहरातील पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करण्याबाबतची कार्यवाही सुरु झाली आहे.  यात १३ मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश असून त्यामध्ये एकुण ४५० पे अँड पार्कची ठिकाणे आहेत. यातील सुमारे ८० जागांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.  पिंपरी चिंचवड शहरातील पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करण्यासाठी निर्मला ऑटो क्रेन सेंटर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  नागरिक व वाहन चालकांच्या माहितीस्तव शहरातील पार्किंग ठिकाणांची यादी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द  करण्यात आली आहे. नो पार्किंग ठिकाणांची  यादी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय  (वाहतुक विभाग)  प्रसिध्द करणार आहे.

 

सदर पार्किंग ठिकाणांची  यादी खालीलप्रमाणे –

पार्किंग पॉलीसी  – फेज १ पार्किंगच्या जागांची यादी

 

अ.      क्र. रस्त्यांची नावे पॅकेज क्र. जागा
भक्ती शक्ती उड्डाण पुलाखाली आणि जवळचा परिसर पॅकेज क्र. – ६
निगडी उड्डाण पुल (कै. मधुकर पवळे उड्डाण पुलाखाली आणि जवळचा परिसर) पॅकेज क्र. – ६
जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी खंडोबा माळच्या जवळचा परिसर पॅकेज क्र. – १
चिंचवड स्टेशन आय आर बी एल बॅक आणि मुंबई सिलेक्षण पॅकेज क्र. – १
एम्पायर इस्टेट उड्डाणपूल खाली पॅकेज क्र. – ६
पिंपरी-फिनोलेक्स चौक चा परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पॅकेज क्र. – १
जुना मुंबई पुणे रस्ता नाशिक फाटा कासारवाडी खराळवाडी आणि दापोडी पॅकेज क्र. – १
चिंचवड स्टेशन ते के. एस. बी. चौक पॅकेज क्र. – ३
निगडी ते बीग इंडिया (सावली हॉटेल) पॅकेज क्र. – १
१० भक्ती शक्ती चौक ते वाल्हेकरवाडी

१.       भेळ चौक

२.       एचडीएफसी बॅक

३.       छत्रपती संभाजी महाराज चौक

४.       वाल्हेकरवाडी

पॅकेज क्र. – १
११ निगडी ते भोसरी

१.       थरमॅक्स चौक

२.       एचडीएफसी कॉलनी

३.       गवळी माथा विजय सेल्स

पॅकेज क्र. – २
१२ हिंजेवाडी ते चिंचवड स्टेशन

१.       डांगे चौक

२.       चाफेकर चौक स्मार्ट पार्किंग

३.       चाफेकर चौक ते लोकमान्य हॉस्पीटल

पॅकेज क्र. – २ १०
१३ आकुर्डी रेल्वे स्टेशन चे समोरील आणि मागील गेट आणि रेल्वे स्टेशन जवळचे रस्ते पॅकेज क्र. – १
१४ काळेवाडी फाटा ते एम्पायर इस्टेट (उड्डाणपूल चालू होईपर्यंत) पॅकेज क्र. – २
१५ नाशिक फाटा ते वाकड (कोकणे चौक आणि शिवार चौक चा परिसर) पॅकेज क्र. – ४

 

महापालिका सभेने मान्यता दिलेले  वाहन पार्किंगचे दर खालीलप्रमाणे

वाहनाचा प्रकार Zone A, Zone B, Zone C, साठीचे दर प्रती तास रक्कम  रुपये
दुचाकी ५/-
रिक्षा ५/-
चारचाकी १०/-
टेम्पो/चारचाकी मिनी ट्रक १५/-
मिनी बस २५/-
खाजगी बस १००/-
ट्रक / ट्रेलर १००/-

 

                                    

Previous articleदेहुरोड सवाना चौकातुन निगडी कडे जाणारा सर्व्हीस रोड सर्व वाहनांकरीता बंद करण्यात येणार
Next articleएचए कंपनीत कोरोना लसनिर्मितीला चालना द्या! : आमदार महेश लांडगे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen − 1 =