Home ताज्या बातम्या ईद निमित्त पिंपरी-चिंचवडमधील गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप हस्ते तोहिद जावेद शेख

ईद निमित्त पिंपरी-चिंचवडमधील गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप हस्ते तोहिद जावेद शेख

74
0

आकुर्डी,दि.१४ मे २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी-चिंचवड शहरातील गोरगरीब मुस्लिम बांधवांना ईदच्या पार्श्वभूमीवर आज जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले रमजान महिना व रमजान ईद मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने सर्वात पवित्र दिवस समजले जातात कुरआन मध्ये सांगितल्याप्रमाणे अनेक मुस्लीम बांधव या महिन्यात अथवा रमजान ईदला गोर गरीब लोकांसाठी म्हणून दान करत असतात.
गेली सुमारे दीड वर्षे देशभरामध्ये कोरोना ने घातलेल्या थैमानामुळे व त्यामुळे करण्यात येत असलेल्या लाॅक डाऊन मुळे सर्वसामान्य व गोरगरिबांचे जीवन विस्कळीत झाले आहे.पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतही लाॅक डाऊन मुळे गोरगरिबांना मोठा फटका बसला आहे. यामुळे ईदच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम बांधवांना गंगानागर, आकुर्डी, निगडी, दत्तवाडी, पिंपरी चिंचवड शहर मित्र परिवार आणि आपुलकी जेष्ठ नागरिक सेवा संघ या सोबतच सोमनाथ गडदे, मंगेश मिसळ,युसूफ पटेल, सुमित कांबळे,सौरभ बगाडे , गणेश शिंदे यांच्या वतीने बिजली नगर येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळ कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा नियमांचे तसेच सोशल डिस्टनसिंगचे पालन करत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पिंपरी-चिंचवड शहरातील गोरगरिबांचे मसीहा ठरलेले दिवंगत नगर सदस्य जावेद भाई शेख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे चिरंजीव तोहिद जावेद शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
दिवंगत जावेद भाई शेख यांनी आपल्या हयातीत पिंपरी-चिंचवड शहरातील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. गरीबाच्या घरात चुल पेटली जावी तसेच त्यांना येणाऱ्या प्रत्येक अडचणी सोडविण्यासाठी जावेदभाई यांनी आपली हयात खर्ची घातली होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगर सदस्य म्हणून काम करत असताना गेली वीस वर्षे त्यांनी अतिशय धाडसी वृत्तीने आपली जबाबदारी चोख पार पाडली होती. जे अधिकारी गरिबांच्या कामांकडे दुर्लक्ष करतात त्यांना त्यांनी त्यांच्या भाषेत सुनावले होते यामुळे आलेल्या अनेक कटू प्रसंगांना ही जावेद भाई सामोरे गेले होते. गोरगरिबांसाठी काम करत असताना कोणत्याही परिस्थितीचा मुलाहिजा न ठेवता ते आपले काम करत होते ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

Previous articleकोंढवा खुर्द मिठानगर येथील कोविड सेंटरचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
Next articleमागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणासाठी राज्यपालांनी हस्तक्षेत करावा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 + 13 =