Home ताज्या बातम्या नगरसेवक सचिन भोसले पि.चि महापालिकेत जलपर्णीचा हार घालून ठिय्या आंदोलन

नगरसेवक सचिन भोसले पि.चि महापालिकेत जलपर्णीचा हार घालून ठिय्या आंदोलन

107
0

पिंपरी,दि.18 मार्च 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदी पवाना नदी तिल वाढत्या जलपर्णी कडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनाचे नगरसेवक सचिन भोसले यांनी महापालिका सभेच्या मुख्य सभागृह समोर जलपर्णीचा हार घालून ठिय्या आंदोलन केले या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी नदीपात्रातील जलपर्णी कडे प्रशासनाचे लक्ष वेधले त्यांना सभागृहात जाऊ दिले जात नव्हते त्यामुळे त्यांच्या सुरक्षा रक्षकांन सोबत झटापटी झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा आज गुरुवारी दि.18 मार्च रोजी आयोजित केली होती सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे ह्या होत्या,यावेळी जलपर्णी काढायला लावून भोसले यांना सभागृहात येऊन देण्याची परवानगी देण्यात आली, पिंपरी-चिंचवड शहरात इंद्रायणी,पवना या नद्या आहेत दोन्ही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी झाले आहे त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होत आहे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी डासांचा त्रास होत आहे अनेक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत प्रशासनाला देखील कल्पना दिली होती परंतु त्यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले.माञ जलपर्णी काढण्याचे कामकाज दरवर्षी केले जाते,जलपर्णी होऊ नये म्हणुन पाण्याच्या अशूद्ध करण्यावर बंधणे ठाकुन नद्या स्वच्छ ठेवण्यावर भर दिला पाहिजे.

Previous articleकच्च्या मालाच्या दरवाढीमुळे पॅकेजिंग इंडस्ट्रीला टाळे लावण्याच्या वेळ; शासनाने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
Next articleपिंपरी-चिंचवड शहरात स्वतःचे वर्चस्व गाजवण्यात आताचे अडकलेले पत्रकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × three =