Home ताज्या बातम्या पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी १२४८ रुग्ण आढळले

पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी १२४८ रुग्ण आढळले

62
0

पिंपरी,दि.18 मार्च 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – पिंपरी-चिंचवड शहरात (दि.17)बुधवारी 1248 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख 16 हजार 896 झाली आहे. आज 615 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख सात हजार 96 झाली आहे. सध्या सात हजार 912 सक्रिय रुग्ण आहेत. महापालिकेच्या सर्व प्रभाग क्षेत्रात आज शंभरपेक्षा अधिक रुग्ण आढळुन आले. अ प्रभाग क्षेत्रात 197, ब प्रभाग क्षेत्रात 169, क प्रभाग क्षेत्रात 168, ड प्रभाग क्षेत्रात 197, इ प्रभाग क्षेत्रात 142, फ प्रभाग क्षेत्रात 126, ग प्रभाग क्षेत्रात 140, ह प्रभाग क्षेत्रात 109 असे एक हजार 248 रुग्ण आढळले.आज शहरातील तीन व बाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झालाआजपर्यंत शहरातील एक हजार 888 आणि बाहेरील 792 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 76 हजार 813 जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत एक हजार 749 रुग्ण उपचार घेत आहेत. सहा हजार 163 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील एक हजार 525 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील पाच हजार 583 जणांची तपासणी केली. 669 जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत एक लाख 50 हजार 217 जणांचे विलगीकरण करण्यात आले.आज 6930 संशयित रुग्णालयात दाखल झाले. 5472 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. 1506 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. 1749 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत सात लाख 19 हजार 871 संशयित रुग्णालयात दाखल झाले. सहा लाख एक हजार 469 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सात लाख नऊ हजार 556 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या शहरात 145 मेजर व 752 मायक्रो असे 897 कंटेन्मेंट झोन आहेत. आज मृत्यू झालेल्या व्यक्ती पिंपरी, पिंपळे निलख, फुगेवाडी, लोहगाव, भंगारवाडी येथील रहिवासी आहेत.महापालिकेच्या आठही प्रभाग क्षेत्रात आज शंभरपेक्षा अधिक रुग्ण आढळले. अ प्रभाग क्षेत्रात 197, ब प्रभाग क्षेत्रात 169, क प्रभाग क्षेत्रात 168, ड प्रभाग क्षेत्रात 197, इ प्रभाग क्षेत्रात 142, फ प्रभाग क्षेत्रात 126, ग प्रभाग क्षेत्रात 140, ह प्रभाग क्षेत्रात 109असे एक हजार 248 रुग्ण आढळलेआहे.

Previous articleपिंपरी चिंचवड शहरात भिम जयंती साजरी करण्यासाठी शासन नियम लावून परवाणगी देण्याची मागणी….
Next articleकच्च्या मालाच्या दरवाढीमुळे पॅकेजिंग इंडस्ट्रीला टाळे लावण्याच्या वेळ; शासनाने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven + 20 =