हिंजवडी,दि.28 फेब्रुवारी 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- गुन्हेगारी मुळशीत फोफावत आहे,ढमाले वस्ती नेरे या ठिकाणी गावगुडं बांधकाम लेबर ठेकेदारांन कडुनही खंडणी वसुल केल्याचा एक प्रकार ढमाले वस्तीत घडला असुन मागासवर्गीय बांधकाम लेबर ठेकेदार यांच्या कडुन गावगुंडानी खंडणी घेऊन आणखी खंडणी साठी केली खंडणी साठी मारहाण, दि.11 मे 2020 ते 23 2021 पर्यंत ढमाले वस्ती इमोशन सोसायटी नेरे येथे काम करत असलेल्या राजेंद्र सिरसाट जागा मालक यांच्या जागेवर येऊन आरोपी वैभव राजाराम ढमाले व आरोपी ओमकार रामदास मेमाणे दोघेही राहणार ढमाले वस्ती नेरे ता.मुळशी जि.पुणे यांनी तक्रारदार दशरथ तुकाराम कसबे यांना बांधकाम करू देण्यासाठी शिवीगाळ करून तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पैशाची मागणी करून दहा हजार रुपये रोख रक्कम व कसबे यांच्या गुगल पे वरून आरोपी ढमाले आणि मेमाणे यांनी गुगल पे वर दहा हजार रुपये असे एकूण वीस हजार रुपये रक्कम खंडणी म्हणून घेतली व तक्रारदार बांधकाम लेबर काॅन्र्टॅक्टर दशरथ कसबे यांना वारंवार पैशाची मागणी करून शिवीगाळ करून हाताने मारहाण केली व धमकावले प्रत्येक वेळी पैसै द्यायचे.म्हणून कसबे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट जिल्हा उपाध्यक्ष रोजगार आघाडी विशाल आप्पा कदम समाधानभाऊ सरवदे सामाजिक कार्यकर्ते याकडे मदत मागत सर्व हकीकत सांगितली,आणि त्यासमवेत पोलिसांनकडे धाव घेतली 27 फेब्रुवारी 2021रोजी 5.23 मि 140/2021 भादवि कलम 384,427,323,504,506,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झालेले आरोपी वैभव राजाराम ढमाले ओमकार रामदास मेमाने दोघेही राहणार धमाले वस्ती नेरे तालुका मुळशी हिंजवडी पोलीसांनी दोन्ही आरोपीना अटक केली,सदरचा तपास पोलीस उपनिरीक्षक गबाळे यांच्याकडे असुन पुढील तपास हिंजवडी पोलिस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.