Home ताज्या बातम्या हेमंत नगराळे महाराष्र्ट राज्याचे नवे पोलिस महासंचालक

हेमंत नगराळे महाराष्र्ट राज्याचे नवे पोलिस महासंचालक

43
0

मंबई,दि.08 जानेवारी 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची सीआयएसएफचे महासंचालकपदी बदली झाल्याने, रिक्त झालेल्या राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार हेमंत नगराळे यांच्याकडे गुरूवारी सोपवण्यात आला. नियुक्तीनंतर लगेचच नगराळे यांंनी महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार हाती घेतला असून, पुढील आदेशापर्यंत या पदाची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्याकडे राहणार आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पोलीस दलामध्ये अनेक बदल करण्यात आले होते. गृहमंत्रालयाने काही निर्णयही घेतले होते. पोलीस दलातील सततच्या हस्तक्षेपाला महासंचालक जयस्वाल यांचा विरोध होता. त्यातून ते नाराज असल्याची चर्चा होती.विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. कालांतराने जयस्वाल यांनी केंद्रीय सेवेत परतण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली होती. राज्य सरकारने ती दिल्यानंतर केंद्र सरकारने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी त्यांची नियुक्ती केली. त्यानुसार त्यांना कार्यमुक्त केले.

जयस्वाल यांच्या रिक्त जागेवर नियुक्तीसाठी सर्वात ज्येष्ठ १९८६च्या बॅचचे होमगार्डचे महासंचालक संजय पांडे यांचा दावा होता. मात्र राज्य सरकारने गुरूवारी तात्पुरता पदभार १९८७च्या बॅचचे महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे दिल्याने तूर्त नगराळे यांनी त्यात बाजी मारली आहे. १९८७ च्या बॅचचे नगराळे यांच्याकडे सध्या कायदे व तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी आहे. त्यासोबतच त्यांना महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. होमगार्डचे महासंचालक संजय पांडे हे जून २०२२ ला तर महासंचालक हेमंत नगराळे हे ऑक्टोबर २०२२ला निवृत्त होणार आहेत.

Previous articleतहसिल कार्यालयासमोर आंदोलन- रिक्षा चालक, मालक यांना अनुदान द्या…..- अजिज शेख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वाहतुक आघाडी
Next articleपिंपरी-चिंचवड पोलिसांना स्मार्ट वॉच, स्पोर्टस् सायकलचे वाटप;नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी ‘स्मार्ट’ होऊन काम करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 3 =