Home ताज्या बातम्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा देणारे – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

64
0

सातारा,दि.३ जानेवारी २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-   क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा देणारे असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ‘महिला शिक्षण दिवस’ म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. हा महिला शिक्षण दिन संपूर्ण भारतात साजरा व्हावा यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.सुरुवातीला नायगाव ता. खंडाळा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास श्री. भुजबळ यांनी अभिवादन करुन पुरातत्व विभागाने सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित उभारलेल्या स्मारक व चित्रशिल्पाची पहाणी केली. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार मकरंद पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन केले.फुले दांपत्यानी समाज परिवर्तनाचे मोठे काम केले आहे यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांबरोबर काम करीत आहे. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अखेरच्या श्वासापर्यंत लोकांसाठी काम करीत राहिल्या. त्यांच्या कार्याचाही गौरव ब्रिटीश सरकारने केला. महाराष्ट्र शासनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात महिला शिक्षण दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम घेऊन फुले दांपत्यांनी केलेल्या कार्याचीही माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार असल्याचेही श्री. भुजबळ यांनी शेवटी सांगितले.फुले दापंत्यांचे काम  काम ऊर्जा व प्रेरणा देणार असून महाराष्ट्रातील एकही मुलगी शाळाबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करु. त्यांचे विचार गाठीशी बांधून कार्य करु असे सांगून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या.

Previous articleओतूर येथील आण्णासाहेब वाघेरे महाविद्यालयात तब्बल तीस वर्षांनी भरला बीकॉम १९९० च्या बॅच चा वर्ग
Next articleसावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी फुले वाड्यात केले अभिवादन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

10 + 7 =