Home ताज्या बातम्या उद्या भारत बंद: देशभरात दळणवळण, बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता

उद्या भारत बंद: देशभरात दळणवळण, बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता

70
0

नवी दिल्ली 07 डिसेंबर2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-:दिल्लीच्या विविध सीमांजवळील (Delhi borders) भागात आंदोलन (agitation) करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांनी (farmers) ८ डिसेंबर रोजी सरकारने (government) मंजूर केलेल्या तीन नव्या कृषीकायद्यांविरोधात (agriculture laws) भारतबंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे. काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना (Shivsena), तेलंगणा राष्ट्रसमिती (TRS), द्रविड मुन्नेत्र कळगम (DMK), समाजवादी पक्ष (Samajvadi Party) , आम आदमी पक्ष (AAP) , राष्ट्रीय जनता दल (RJD) , बहुजन समाज पक्ष (BSP) , डावे पक्ष (left parties) आणि इतर अनेक राजकीय पक्षांनी या भारतबंदला पाठिंबा (support) दिला आहे.

दिल्लीच्या सर्व सीमा रोखण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सर्व सीमा रोखण्याचा इशारा दिला आहे. सध्या चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे देशाच्या राजधानीच्या सर्व सीमारेषांवर प्रचंड वाहतूक कोंडी दिसून येत आहे, कारण पंजाब, हरियाणा आणि देशाच्या इतर भागातील हजारो शेतकरी हे दहा दिवसांपेक्षा अधिक काळापासून दिल्लीच्या सीमांवर मुक्काम ठोकून आहेत.

विरोधी पक्षांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे, पण असेही सांगितले आहे की ते पश्चिम बंगालमध्ये भारतबंदला पाठिंबा देणार नाहीत, कारण हे पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात आहे. याशिवाय या आंदोलनाला पाठिंबा देत विरोधी पक्षांनी सरकारला हे तिन्ही वादग्रस्त कायदे मागे घेण्याचा आग्रह केला आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की हे कायदे भारताच्या अन्नसुरक्षेला धोका आहेत, यामुळे भारताच्या शेतीचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान होईल आणि किमान हमीभाव यंत्रणेलाही धोका आहे. भारतीय शेतीबाजार हा बहुदेशी शेतीव्यवसायांच्या आणि स्थानिक कॉर्पोरेटच्या घशात घालण्याची ही खेळी आहे.

विविध कामगार संघटनांचा बंदला पाठिंबा

इंडियन नॅशनल ट्रेड यूनियन काँग्रेस (आयएनटीयूसी), ऑल इंडिया ट्रेड यूनियन काँग्रेस (एआयटीयूसी), हिंद मजदूर सभा (एचएमएस), सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स (सीआयटीयू), ऑल इंडिया यूनायटेड ट्रेड यूनियन सेंटर (एआययूटीयूसी) आणि ट्रेड यूनियन कोऑर्डिनेशन सेंटर (टीयूसीसी) या सर्व कामगार संघटनांनी भारतबंदला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. दिल्ली टॅक्सी टूरिस्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन, दिल्ली स्टेट टॅक्सी कोऑपरेटिव्ह सोसायटी, कौमी एकता वेलफेअर असोसिएशन आणि इतरही अनेक संघटनांनी आपला पाठिंबा या बंदला दिला आहे.

Previous articleपुढील काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगातील अव्वल अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट होईल
Next article…स्पर्धेत अडकून बोजा वाढविण्यापेक्षा नियोजनबध्द प्रगती साधण्यासाठी ठेकेदारांनी प्रयत्न करावे-चेअरमन विनित देव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × four =